मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे तलावात जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 03:15 PM2019-10-06T15:15:10+5:302019-10-06T15:18:01+5:30

हरताळे येथील तलाव गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोरडा व ठणठणाट असताना यंदा समाधानकारक पावसामुळे जलसाठा झाला. ग्रामस्थांनी प्रथमच जलपूजन केले.

Water Supply in Hartale Lake in Muktinagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे तलावात जलपूजन

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे तलावात जलपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देपाच-सहा वर्षांनंतर प्रथमच जलसाठाग्रामस्थांनी केला जल्लोषवहीगायन व भजनी मंडळांनी काढली मिरवणूकतलावात उन्हाळ्यातही पाणी राहण्यासाठी केली प्रार्थना

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : हरताळे येथील पुरातन व ऐतिहासिक असलेला तलाव गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोरडा व ठणठणाट असताना यंदा समाधानकारक पावसामुळे ३० ते ३५ टक्के जलसाठा झाला आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेत तलावात जमा झालेल्या पाण्याचे प्रथमच जलपूजन केले. याप्रसंगी साडी-चोळी, रुमाल, टोपी, संपूर्ण नैवेद्य वाहण्यात आले. यावेळी गावातून वहीगायन व भजनी मंडळींनी मिरवणूक काढली. शिवशक्ती मंदिराजवळील घाटावर धार्मिक पद्धतीने गोपाळ जोशी यांनी जलपूजन केले. गावातील रामदास मुलांडे यांना सपत्नीक पूजनाचा मान मिळाला. गावातील असंख्य भाविक भक्त, महिला मंडळ यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन येथील किसन चव्हाण, चंद्रमणी इंगळे, प्रदीप काळे यांनी केले होते. याप्रसंगी सीताराम चौरे, अशोक चौधरी, जयेश कार्ले, किशोर गावंडे, पूनम जैन, ईश्वर राहणे, समाधान कार्ले, नामदेव भड, आत्माराम चव्हाण, संतोष मिस्तरी, प्रभाकर चौधरी, सुनील चौधरी, आनंदा वालखड, तुषार पुजारी, शेख रहमान, सोपान दांडगे, भागवत शेळके, मधुकर भगत, मोहन चांदेलकर, नंदलाल पुजारी, पंडित काळे, अनिल काळे, एकनाथ कोळी, भागवत धबाळे, माधव पाटील, शांताराम निकम, रामभाऊ निकम, प्रल्हाद चौरे, गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व भाविक महिला उपस्थित होत्या.
सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा जल्लोष सोहळा साजरा केला. तलावात उन्हाळ्यातही पाणी कायम राहण्यासाठी प्रार्थना केली. सध्या ३० ते ३५ टक्के तलावात जलसाठा असला तरी तापी-पूर्णा नदीवरून या तलावात पाणी सोडण्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

Web Title: Water Supply in Hartale Lake in Muktinagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.