जळगावात पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

By admin | Published: June 11, 2017 11:46 AM2017-06-11T11:46:19+5:302017-06-11T11:46:19+5:30

तांबापुरात व्हॉल्वमनला बेदम मारहाण. पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

Water supply in Jalgaon district | जळगावात पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

जळगावात पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.  तांबापुरा भागातील काही नागरिकांना शनिवारी पाणी न मिळाल्याने संतप्त जमावाने मनपाचा व्हॉल्वमन  शेख कादर  शेख नबी (वय 56 रा. तांबापुरा) यांना 30 ते 40 जणांनी  बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा हात मोडला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर या भागात पुन्हा वाद होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शनिवारी रात्री 12.30 वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी पुरवठा करण्यात आला. 
शहरास पाणी पुरवठा करणा:या वाघूर पाणी पुरवठा योजनेच्या उमाळा येथील पपींग व जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरात आठवडा भरापासून पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता. तर अद्यापही काही भागात हा पाणी पुरवठा विस्कळीत आहे.  शनिवारी शिवाजी नगर, गेंदालाल मिल, एस.एम.आय.टी. कॉलेज, पिंप्राळ्याचा काही भाग, खोटे नगर, देवेंद्र नगर, पार्वती नगर, गिरणा टाकी परिसरात पाणी पुरवठा झाला. मात्र यातील ब:याच भागात हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला.  
तांबापुरात पाणी प्रश्न पेटला
तांबापुरा भागात आज  सकाळी काही भागात अर्धा तास पाणीपुरवठा झाला. मात्र काही भागात पाणी न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले. व्हॉल्वमन शेख कादर  दुपारी 4 वाजता या भागातील रहिवाशांना दिसले असता  30 ते 40 नागरिकांनी  त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला तर काही जणांनी त्यांना  मारहाण केली. यात कादर यांचा हात मोडला गेला आहे. याबाबतची माहिती त्यांनी मनपाच्या अधिका:यांना कळविली. त्यांनी तत्काळ त्यास दवाखान्यात हलविले. 
कर्मचारी पोहोचले पोलिसांकडे
मनपाचे पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता किशोर चौधरी, कादर व्हॉल्वमन व अन्य काही जण शनिवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान एमआयडीसी पोलिसांकडे गेले होते. तांबापुरातील उर्वरित भागात पाणी पुरवठा करण्यासाठी व्हॉल्वर्पयत जायचे असल्याने पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी या कर्मचा:यांनी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनीदेखील बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली. 

Web Title: Water supply in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.