जळगावात आज कमी दाबाने होणार पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:24 PM2018-12-11T15:24:59+5:302018-12-11T15:27:14+5:30
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणावरील पंपीग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सर्व व्हॉल्व्हची सोमवारी दुरुस्ती करण्यात आली
जळगाव : शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणावरील पंपीग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सर्व व्हॉल्व्हची सोमवारी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ही दुरुस्ती केल्यानंतर लाईन वॉश आऊट करताना तांत्रिक अडचण आल्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पाणी पुरवठा विभागाकडून उन्हाळ्यापूर्वी पाईप-लाईन दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी गिरणा टाकी येथील पंप हाऊसच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसह १५ इंचचे चार व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आली.
तसेच वाघूर धरणाचे व्हॉल्व्ह बंद करण्यात येणार असल्याने, उमाळा जलशुद्धीकरण केंद्र जवळील पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती केल्यानंतर पाईप लाईनचे वॉश आऊट करण्यात येते. मात्र, हे करताना काही ठिकाणी लिकेज राहिले. हे लिकेज उमाळा परिसरातील जंगलच्या भागात राहील्यामुळे रात्री ही लिकेज करताना अडचणी येत होत्या.
या भागात होणार आज पाणीपुरवठा
वाल्मीक नगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदारोड व परिसर, नित्यानंद नगर टाकी परिसर-मोहन नगर, नेहरू नगर परिसर, खंडेराव नगर परिसर- हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराज पार्क, आसावा नगर, निसर्ग कॉलनी, खोटे नगर टाकीवरील भाग- द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्री नगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकी- शिवाजी नगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वर नगर व इतर भाग.