वाकडी प्रकरण : जलसंपदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:09 PM2018-06-20T13:09:59+5:302018-06-20T13:09:59+5:30
राष्टÑवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांची मागणी
जळगाव : वाकडी पिडीत कुटुंबास सांत्वनपर भेट न देणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्टÑवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकडी येथील घटनेबाबत गुन्हा दाखल होऊ नये यासाठी कुटुंबावर दबाव येत होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील हा विषय असल्याने त्यांनी राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून तातडीने चांदणे कुटुंबियांची भेट घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी भेट दिली नाही.
त्यामुळे मागासवर्गीय कुटुंबातील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराची जबाबदारी घेऊन महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मानकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्याप्रसंगी जळगाव महानगराध्यक्ष गणेश नन्नवरे, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर म्हस्के, जामनेर तालुकाध्यक्ष प्रभाकर इंगळे, जामनेर तालुका उपाध्यक्ष वसंत सपकाळे, एन.पी. गायकवाड, विनोद बिºहाडे आदी उपस्थित होते.