जळगाव जिल्ह्यातील 23 गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा
By admin | Published: May 22, 2017 12:18 PM2017-05-22T12:18:48+5:302017-05-22T12:18:48+5:30
अमळनेर तालुक्यात भीषण टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी
Next
जळगाव, दि.22- उन्हाच्या तडाखा वाढत असल्याने टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र जिलतील काही तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. आतार्पयत जिलत 23 गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षी पावसाची सरासरी जिलन पूर्ण केली असली तरी काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडला होता. त्याचे परिणाम आता जाणवत असून काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचेच लक्षात येते.
जिलतील 23 गावांना आतार्पयत टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जळगाव तालुक्यात 1 गाव, भुसावळ 1, अमळनेर 17, पारोळा 4 अशी परिस्थिती आहे. गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करणारे टॅँकर आले की नागरिकांची धावपळ उडत असते. सार्वजनिक पाणी पुरवठय़ाचे स्त्रोत आटल्यामुळे या गावांमध्ये ही परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
पाणी टंचाई निवारनासाठी विविध उपाय योजनांमध्ये 91 गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करून तेथून पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास 86 विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. जामनेर तालुक्यात एका गावात तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. 19 गावांमध्ये 37 नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तीन गावांमध्ये चार कुपनलिका करण्यात आल्या आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने अमळनेर तालुक्यातील एका गावात विहिर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे.