भुसावळात पाणीबाणी, पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 07:23 PM2019-04-10T19:23:55+5:302019-04-10T19:25:23+5:30
गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.
भुसावळ, जि.जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.
शहरातील पंचशील नगर, गौतम नगर, गौसिया नगर, गंगाराम प्लॉट, पापा नगर व काझी प्लॉट भागात पालिकेच्या नाकर्तेपणामुळे महिना उलटला तरी पाणी नाही. या भागात गोरगरीब राहात असल्याने ते टँकरही आणू शकत नाही. पाणी नसल्याने महिला हतबल झाल्या आहेत. ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. टॅकरवाल्यांचीही मनमानी सुरू आहे. हतनूर धरणात जलसाठा कमी आह,े हे माहीत असूनही शहरातील विंधन विहिरी व विहिरींंचा शोध घेऊन पाणीटंचाई दूर करता आली असती. परंतु सुस्त प्रशासनामुळे या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आधीच वाढते तापमान, त्यात पाणीटंचाईने जनता व्याकूळ झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी जनतेची धावाधाव सुरू आहे. या गंभीर प्रश्नाची शासनाने दखल घ्यावी या मागणीचे निवेदन मोर्चाद्वारे प्रांत अधिकाº्यांना देण्यात आले. राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात विक्रम वानखेडे, असगर शेख, आकाश गिरधर, नजीर शहा, पंकज सपकाळे, शहनाज बी, विकास गिरधर, शबानाबी शेख अलियार, आरिफाबी शेख मोहम्मद, सायराबी ईस्माईल, सत्तार बागवान, शबिया बी, जुबेदा बी, रजिया खातून, शेख सलमा शेख रज्जाक यांच्यासह इतरांचा सहभाग होता.