जळगावात आजही उशिराने पाणी पुरवठा होणार
By admin | Published: June 6, 2017 11:06 AM2017-06-06T11:06:33+5:302017-06-06T11:06:33+5:30
विजेचा लपंडाव : अनेक भागांना फटका
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.6 - वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शनिवार, 3 जून रोजी सायंकाळपासून रात्रभर खंडित झाल्याने रविवारी खोटेनगर व परिसरातील वसाहतींमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. सोमवारी सायंकाळपासून रात्री उशिरार्पयत विजेचा लपंडाव सुरु असल्याने शिवाजीनगर, गेंदालाल मील, रिंगरोड, नवीपेठ भागात मंगळवारी उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी दिली.
वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राचा शनिवारी सायंकाळपासून रात्रभर वीजपुरवठा खंडित असल्याने रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले गेल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री पुन्हा या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाण्याच्या टाक्या जेवढय़ा भरल्या होत्या, त्यावरून पाणीपुरवठा झाला. पिंप्राळा, खोटेनगर, खंडेरावनगर भागात वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे या भागात उशिराने झाला.
वीज मंडळाने पाणीपुरवठय़ाची निकड लक्षात घेत वाघूर पंपिंग व जलशुद्धीकरण केंद्राला पर्यायी वीज वाहिनीवरून वीजपुरवठा जोडून दिला आहे. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा होईल मात्र उशिराने होणार आहे.