जळगावात एक दिवस उशीराने होणार पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:03 PM2018-05-18T14:03:40+5:302018-05-18T14:03:40+5:30
जळगाव शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ : शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
मनपा पाणी पुरवठा विभाग पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. वाघूर रॉ वॉटर पंपीग येथील विद्युत पंपाची दुरुस्ती, विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्यांची छटाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील गिरणा टाकी चर्चजवळ वाघूर पाणी पुरवठा योजनेतंर्गत टाकण्यात आलेली १२०० मीमी पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे १८ मे रोजी होणारा पाणी पुरवठा काम पूर्ण झाल्यानंतर १९ मे रोजी नियमित वेळेवर करण्यात येणार आहे. १९ व २० रोजी होणारा पाणी पुरवठा अनुक्रमे २० व २१ रोजी होणार आहे.
शनिवारी या भागात पाणी पुरवठा
वाल्मीक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड, मेहरूण परिरसर, नित्यानंद टाकी परिसर, पिंप्राळा गावठाण, हरिविठ्ठल परिसर, मानराज पार्क, असावा नगर, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, तांबापुरा, वाघ नगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगरात पाणी पुरवठा होईल.
आज या भागात होईल पाणी पुरवठा
पाईप लाईन दुरुस्तीमुळे शहरातील बहुतांश भागात शुक्रवारी पुरवठा होणार नाही. मात्र, जुना खेडी रोड परिसरातील खेडी गाव, शंकरराव नगर, ज्ञानदेव नगर, तळेले कॉलनी, योगेश्वर नगर, सदोबा नगर या भागात पाणी पुरवठा होणार आहे.