धरणांमधून सोडले तापी, बोरी व पांझरा नदीत पाणी, नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:05 PM2017-10-14T13:05:50+5:302017-10-14T13:09:31+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यांना लाभ
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 14 - हतनूर धरणातून तापी नदीत, अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी आणि तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने टंचाईग्रस्त अमळनेर तालुक्याला खूप मोठा दिलासा मिळून नदीकाठावरील गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मार्गी लागणार आहे .
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पिण्यासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यमुले धरनात यावर्षी साधारण 60टक्क्यांवर पाणी साठा आहे .धरणाच्या डाव्या कालव्यातुण पाणी सोडण्यात आले आह त्यामुळे .पांझरा काठावरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे .पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंधखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायद होणार आहे .यामुळे पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे .
न्याहळोद , कवठळ, वालखेडा, जापी शिरडाने, कंचनपूर, मांडळ, वावडे, मुडी, बोदर्डे, लोण बु., लोण खु., लोण चारम, भरवस, बेटावद, भिलाली, शाहापूर, तांदळी इत्यादी गावांना फायदा होणार आहे .त्याचप्रमाणे तामसवाडी धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने बहादरपूर, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, शिरुड, मंगरूळ, तासखेडा, अमोडे, नंदगाव, अंतुर्ली रंजाने, मुडी दरेंगाव, करणखेडे, अंबारे , खापरखेडा आदी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे. तापीलाही पाणी सुटल्याने पाडळसरे धरणात पाणी साठा, तसेच कलाली डोह व जळोद गंगापुरीडोह भरल्याने शहरासह तापी काठावरील गावच्या विहिरींची पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे
अमळनेर तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 23 गावांना पाणी टंचाई असून टँकर सुरू आहेत टँकर कोठून भरावेत असा प्रश्न प्रशासनाला पडला होता परंतु तालुक्याच्या तिन्ही दिशांना असलेल्या बोरी नदी, तापी नदी, पांझरा नदी वाहू लागल्याने बहुतेक गावांचा प्रश्न सुटणार आहे
परंतू पांझरा नदीवर असलेले वालखेडा कळबू बाम्हने हे लहान बंधायार्ची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारण सुटलेले पाणी हे धरणास गळती असल्याने ते थांबत नसल्यामुळे पाणी पूर्ण वाहून जाते त्यामुळे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी होत आहे ज्यामुळे या पाण्याचा अधिक काळ फायदा होईल .