पाचोरा येथे नदीपात्रात पाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 06:54 PM2019-02-14T18:54:14+5:302019-02-14T18:55:10+5:30

पाचोरा , जि.जळगाव : पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाºयालगत होत असलेली पाणीचोरी थांबविण्यासाठी पाचोरा पालिकेच्या पाणीपुरवठा ...

Water theft in the river bank at Pachora | पाचोरा येथे नदीपात्रात पाणी चोरी

पाचोरा येथे नदीपात्रात पाणी चोरी

Next
ठळक मुद्देपालिकेच्या पथकाची धडक कारवाईपाणी चोरी करणाऱ्या तीन शेतकºयांचे तीन विद्युत पंप जप्तशेतकºयांनी घातली पालिकेच्या पथकाशी हुज्जत

पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाºयालगत होत असलेली पाणीचोरी थांबविण्यासाठी पाचोरा पालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने धडक कारवाई केली. यावेळी मोहिमेतील कर्मचाºयांशी शेतकºयांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर वाद टळला. या धडक मोहिमेत तीन विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या.
पाचोरा शहराला गिरणा पात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. जिल्हाधिकाºयांनी सदरचे आवर्तन पिण्यासाठी सोडले आहे. मागील सोडलेले आवर्तन सोडल्यानंतर बराच कालावधी झाला आहे. सद्य:स्थितीत केटीवेअरमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पुढील आवर्तन केव्हा सुटते हे निश्चित नसल्याने असलेला साठा जपण्यासाठी गुरुवारी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाने धडका मोहीम हाती घेतली होती. यावेळी पात्रातून पाणी चोरणाºया शेतकºयांच्या मोटारी जप्त केल्या. यावेळी काही शेतकरी उसतोडीचा कोयता व विळा घेऊन या धडक मोहिमेत शिरले. परंतु पालिकेचे उपअधीवेक्षक किरण बाविस्कर यांनी शेतकºयांना समज देवून सांगितले की, या बंधाºयाच्या पाणी साठ्यावर पाचोरा शहरातील एक लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचन व फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच जिल्हाधिकाºयांनी सोडले आहे. सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. नंतर ते शेतकरी माघारी वळले. या वेळी भटगाव व माणकी शिवारातील तीन विद्युत पंप मोहिमेने जप्त केले.
या वेळी किरण बाविस्कर म्हणाले की, सध्या असलेला पाणीसाठा टिकवण्यासाठी पाणीचोरी करणाºयांबाबत कठोर पावले उचलल्याशिवाय शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर देणे शक्य होणार नाही. येणाºया काळात अशा मोहिमेचे प्रमाण वाढेल हे निश्चित.
या मोहिमेत पाणीपुरवठा उपअधीवेक्षक किरण बाविस्कर, प्रकाश गोसावी, साहेबराव खैरणार, नरेश आदिवाल, संजय जाधव, नीळकंठ ब्राह्मणे, संजय जगताप, सुनील वाकडे, विजय ब्राह्मणे, आकाश खेडकर व युसुफ पठाण आदी कर्मचाºयांचा समावेश होता.

Web Title: Water theft in the river bank at Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.