सप्टेंबरपर्यंत वाघनगरवासीयांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:54 PM2020-07-29T12:54:28+5:302020-07-29T12:54:56+5:30

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या वाघनगरातील पाणी योजना पूर्णत्वाला अखेर मुहूर्त मिळाला असून सप्टेंबर अखेरपर्यंत नागरिकांना पाणी मिळले, ...

Water to Waghanagar residents till September | सप्टेंबरपर्यंत वाघनगरवासीयांना पाणी

सप्टेंबरपर्यंत वाघनगरवासीयांना पाणी

Next

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या वाघनगरातील पाणी योजना पूर्णत्वाला अखेर मुहूर्त मिळाला असून सप्टेंबर अखेरपर्यंत नागरिकांना पाणी मिळले, असा शब्द मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे़ पालकमंत्री पाटील यांनी या योजनांबाबत अजिंठा विश्रामगृहात सोमवारी आढावा बैठक घेतली़ दरम्यान, वाढीव वस्तीच्या योजनेबाबत मात्र मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे़, अशी माहिती उपअभियंता बी़ जे़ पाटील यांनी दिली़


वाघनगरातील जलस्वराज्य टप्पा टू अंतर्गत १५ किमीच्या योजनेचे काम ८० टक्के झाले असून जलवाहिनीचे कामे सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ वाढीव २२ किमीच्या योजनेसाठी नवीन अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्याला मार्चपर्यंतचा अवधी लागणार आहे़ अशी माहिती अधिकाºयांनी यावेळी दिली़ दरम्यान, योजना रेंगाळत असल्याने शिवाय वाढीवस्तीबाबत ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून तीन वर्षांपासून पाण्यासाठी झगडावे लागते हे दुर्देव असल्याचेही बोलले जात आहे़ नागरिकांनी पाण्यासाठी असंख्य निवेदनही दिली आहेत, मात्र, त्यावर तातडीने कार्यवाही होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे़
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता बी. जे. पाटील, ए. बी. किंरगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.

५०० मिटरचे काम अपूर्ण
जळगाव शहरातील वाघनगर भागातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. याबाबत नागरीक वारंवार तक्रारी करीत असल्याचे पालकमंत्री आणि आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत सांगितले असता वाघनगरसाठी वाघूर धरणावरील जॅकवेलचे व जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईनचे फक्त ५०० मीटरचे काम अपूर्ण आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होईल, अशी ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बी. जे. पाटील यांनी बैठकीत दिली.

नवीन भागांसाठी योजनेचे नियोजन
पाळधी खुर्द व बुद्रक या गावांना पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. आव्हाणे गावाच्या आजूबाजूला असणाºया सत्यमपार्क, रोहनवाडी, हरीओमनगर या भागासाठी स्वतंत्र योजना तयार करता येईल का याचा अंदाज घेण्यात यावा. विदगावसाठी नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे, तरसोदला पाणीपुरवठा करण्यासाठी मन्यारखेडे येथून पाणीपुरवठा करता येईल किंवा कसे याबाबतचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील काम लवकरात लवकर करावे. त्याचप्रमाणे आसोदा येथे नवीन पाईपलाईन करावी. शिरसोली येथील पाण्याची टाकी जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन टाकी तयार करावी. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करतांना नवीन नियमाप्रमाणे प्रती नागरीक प्रती दिवसासाठी ५५ लिटर पाणी याप्रमाणे करण्यात यावे. त्याचबरोबर नशिराबाद येथील पाणीपुरवठ्याची तपासणी करुन घेण्याचे निर्देशही पालकमत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत.

 

Web Title: Water to Waghanagar residents till September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.