१७ गावांमध्ये एरंडोल तालुक्यात ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 07:16 PM2019-05-11T19:16:42+5:302019-05-11T19:17:47+5:30
अधिग्रहीत विहिरी आटल्या : पाण्यासाठी भटकंती
एरंडोल : एरंडोल तालुक्यात १७ गावांवर पाणी बाणी निर्माण झालेली आहे.
याठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा होत आहे. सदरचा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करावी लागत आहे. ७ गावांच्या अधिग्रहण केलेल्या विहिरी आटल्या आहेत म्हणून दुसऱ्या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
टोळी, आनंद नगर, पिंपळकोठा प्र.चा, पिप्रीं प्र. चा, खडकेसिम, मालखेडा,जळू,उमरे, जवखेडा बुद्रुक, विखरण, जवखेडे खुर्द, पिंपरी बुद्रुक, खुर्द पळासदळ, उमरदे, वरखेडी, पातरखेडे, या गावांचा समावेश आहे.
विखरणला रोज ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील मोठ्या गावांपैकी विखरण हे मोठे गाव असून या ठिकाणी रोज टँकरच्या सहा फेºया १ लाख ८० हजार लिटर पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकले जाते तेथून गावाला पाणी वितरण होते.
एरंडोल शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी लमांजन आकस्मित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे.
शुक्रवारी चाचणी झाली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकर योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती संबंधित अधिकृत सूत्रांनी दिली आहे