नगरसेवक घेऊन देणार पिवळ्या पाण्याचे नमुने
By admin | Published: May 12, 2017 04:56 PM2017-05-12T16:56:19+5:302017-05-12T16:56:19+5:30
जळगाव मनपाच्या स्थायी समिती सभेत दुषित पाण्याच्या विषयावर जोरदार चर्चा
Next
जळगाव,दि.12- शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पिवळ्या व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या विषयावर शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. त्यावेळी मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी पाणीपुरवठा विभागाने त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, असे आव्हान दिले.
हा विषय उपस्थित करताना अनंत जोशी यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पिवळ्या व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र कुणीही त्याबाबत बोलायला तयार नाही. पाणीपुरवठा विभागाला विचारले तर दरवर्षीच ही समस्या उद्भवते, मात्र पाणी पिण्यास योग्य असल्याचे उत्तर मिळते. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी आम्ही नियमितपणे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवितो. आजच मेरीलादेखील पाणीनमुने तपासणीसाठी पाठविल्याचे सांगितले. पृथ्वीराज सोनवणे यांनी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणा:या केमिकल्सचा दर्जा योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर जोशी यांनी ते सांगतील त्या ठिकाणाहून पाणीनमुने घेण्याचे आव्हान दिले. ते पाणीपुरवठा विभागाने स्विकारले.