यावल तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:00 PM2019-04-08T17:00:20+5:302019-04-08T17:03:36+5:30
यावल तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना टंचाईशी सामना करावा लागत आहे. तसेच गुराढोरांच्या पाण्याचा प्रश गंभीर हात आहे.
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना टंचाईशी सामना करावा लागत आहे. तसेच गुराढोरांच्या पाण्याचा प्रश गंभीर हात आहे.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई योजनेंतर्गत २०० फुटापर्यंत दोन बोअरवेल केल्या होत्या. दोन्ही बोअरवेलला पाणी लागले नसल्याने ग्रामपंचायतीने त्यात स्वखर्चाने १०० फुट पुन्हा बोअर केले. तरीही पाणी लागले नाही. गेल्या काही वर्षात तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावली असल्याने जमीनीत पाणीच नसल्याने दोन्ही बोअर कोरडेठाक पडले आहेत.
ग्रामपंचातीच्या मालकीच्या असलेल्या विहिरीचीही पातळी खोल गेल्याने तिला १५० फुटांचे ठेचा बोअर मारले. मात्र काही उपयोग झाला नाही. पुन्हा सरपंच भागवत पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे अनामत रक्कम ठेऊन विहिरीत ५०० फुटांपर्यंत बोअर केले, मात्र दुर्दैवाने ते बोअर चोकअप झाले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेने या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष घालून चौदाव्या वित्त आयोगातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे सरपंच भागवत पाटील यांनी सांगितले.