मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:26 PM2020-07-31T23:26:27+5:302020-07-31T23:27:02+5:30
२२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला : मन्याड आणि गिरणाला पूर येण्याच्या भीतीने सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव / आडगाव : मन्याड धरणाच्या वरील क्षेत्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हे धरण ९० टक्के भरले आहे. लवकरच हे धरण पूर्ण भरुन धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने मन्याड तसेच गिरणा नदी काढावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मन्याड नदी ही सायगाव येथून जात असल्याने गिरणा नदीसही केव्हाही पूर येऊ शकतो. यामुळे नांन्द्रे, अलवाडी, सायगाव, पिलखोड, प्रिंपी, टाकळी प्र. दे, उंबरखेड, डोण, ब्राम्हणशेवगे आदी गावे या नदीच्या काठावर असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान धरण भरल्याने परिसरातील २२ गावांना शेती व पिण्याच्या प्रश्न अवलंबून आहे. हा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच नियोजन करावे
गेल्या वर्षी परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झाले व धरणही भरले डिसेंबर/जानेवारी पर्यंत विहिरींचे पाणी पुरेल म्हणून शेतकºयांनी पाटबंधारे विभागाला संक्रात नंतर पहिले आवर्तन सोडण्याचे सुचवले होते. परंतु गेल्या दोन/तीन वषार्पासून रिकामा असलेला पाट व त्यात वाढलेले गवत आणि काटेरी झुडूपे वेळेवर मजूर मिळत नसल्याने घाईगर्दीत झालेली पाटाची साफसफाई आदीमुळे २१ ते २२ जानेवारीला पहिले आवर्तन सोडले असता मध्येच वांद्रे गावाजवळ पाटफुटला. त्यामुळे दुरूस्ती साठी पुन्हा पाट ९ते १० दिवसासाठी बंद करावा लागला त्यामुळे १५ जानेवारीला सुटणारे आवर्तन फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सोडण्यात आले. यामध्ये विहिरीं एकदम आटल्या. सर्व शेतकरी पाणी पाणी करू लागले. शेतकºयांना दुसरे आवर्तन देतांना खुप उशीर झाला त्यामुळे पाणी असूनही निव्वळ नियोजनाअभावी हातचा हंगाम वाया गेला. ही चुक पूंन्हा होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आत्तापासूनच पाटाची साफसफाई करून हंगामी कर्मचारी वाढवून घ्यावे व धरणांतील सांडव्याद्वारे वाया जाणारे पाणी पाटचारींना सोडावे अशी मागणी होऊ लागली आहे.