आम्ही दोघे बहीण भाऊ, गावकारभाराची धुरा वाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 02:11 PM2021-01-29T14:11:03+5:302021-01-29T14:13:44+5:30

खेडगाव अन् खडकीसीम सरपंचपदाला नात्याच्या गुंफणाचा असाही विलक्षण योगायोग पहायला मिळणार आहे.

We are both brothers and sisters | आम्ही दोघे बहीण भाऊ, गावकारभाराची धुरा वाहू

आम्ही दोघे बहीण भाऊ, गावकारभाराची धुरा वाहू

Next
ठळक मुद्देखेडगाव अन् खडकीसीम सरपंचपदाला नात्याच्या गुंफणाचा असाही विलक्षण योगायोग

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव : येथील सरपंचपदी अनुसूचित जमातीसाठीच्या प्रवर्गाच्या निघालेल्या आरक्षणात इकडे सासरी रुपाली गजानन गोकुळ यांची वर्णी लागणार आहे, तर तिकडे माहेरी त्यांचे भाऊ विकास नवल सोनवणे हे एरंडोल तालुक्यातील खडकेसीम (गणेशनगर) येथील याच प्रवर्गाच्या आरक्षणानुसार सरपंच म्हणून गावाची धुरा सांभाळणार आहेत. हा ग्रा. पं. सरपंचपदाच्या निवडीचा विलक्षण योगायोग व एक इतिहास ठरावा.

खेडगाव ग्रा. पं. स्थापनेनंतर मध्यतंरी मालताबाई विजय वाणी यांच्या कार्यकाळात सुभद्राबाई भिल या अनुसूचित जमातीच्या महिलेला २००९-२०१० या वर्षात सरपंचपदाचा मान मिळाला असला तरी तो आरक्षणाव्यतिरिक्त बहाल करण्यात आला होता. ६०-७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच या प्रवर्गासाठी येथे आरक्षण निघाले हे  विशेष होय. अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणामुळे मात्र येथे सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्यांची चांगलीच गोची झाली आहे. सरपंचपदाचे मनोइच्छीत आरक्षण निघण्यासाठी. देव पाण्यात टाकण्यापासून ते सदस्य फुटू नये म्हणुन देवावर पाणी टाकण्यापर्यंत शपथ घेण्याच्या दोन्ही गटाच्या तयारीवर यामुळे पाणी फिरले आहे. याआधी खेडगाव येथे अनुसूचित जाती महिला मनीषा सोनवणे या सलग पाच वर्षे सरपंच होत्या. आता पुन्हा पाच वर्षे स्थिर सरपंच पद एकाच तरुण महिलेकडे राहणार आहे. यामुळे सरपंचपद एक- एक वर्ष वाटून घेण्याची वेळ टळली असली तरी आता उपसरपंचपद मागील पंचवार्षिकीप्रमाणे एक-एक वर्ष वाटत सरपंच नही उपसरपंच तो सही..! या इराद्याने दोन्ही गट मैदानात उतरतात की सहमतीने खुर्चीचा मान राखतात हे येणारा काळच ठरवेल.

अंजनीसुत अन् गिरणाकन्या

अंजनी अन् गिरणेचा नदीजोड प्रमाणेच  दोघे बहीण-भावांच्या नात्याची गुंफण सरपंचपदाच्या खुर्चीला जोडणारी ठरली आहे. रुपाली गोकुळ या डी.एड.पदविका व कला पदवीधारक, तर भाऊ विकास सोनवणे हा कला पदवीधारक व अविवाहीत आहे. त्यांच्या डोक्यावर सरपंचपदाचा चढलेला ताज या कुटुंबासाठी गौरवास्पद असाच आहे. आता हे दोन्ही बहीण-भाऊ आपापल्या गावात गावकारभा-याची भूमिका कशी पार पाडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  ग्रामपंचायतीत समाजाने मला बिनविरोध निवडून दिले. पुन्हा आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्याने आपसुकच एक पैसा खर्च न करता सरपंचपद मिळाले. याची पावती म्हणून समाजाला व गावाला विकासकामाच्या माध्यमातून आमच्या आडनावाप्रमाणे 'गोकुळ ग्राम’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
             -रुपाली गजानन गोकुळ, भावी सरपंच, खेडगाव, ता.भडगाव

Web Title: We are both brothers and sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.