आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नकोस....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:07+5:302021-01-02T04:14:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नकासे, असे म्हणत चार तरुणांनी ...

We are the grandfathers of this area, don't follow our advice .... | आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नकोस....

आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नकोस....

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नकासे, असे म्हणत चार तरुणांनी स्वप्निल ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर (१७, रा़ गणेशवाडी) या युवकाला बेदम मारहाण करून डोक्यात फरशी टाकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास पांचाळ गल्ली परिसरातील स्मशानभूमीजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे भूषण माळी, आकाश मराठे, पीयूष ठाकूर, पवन बाविस्कर (सर्व रा. तुकाराम वाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक महिन्यापूर्वी स्वप्निल ठाकूर याचा तुकाराम वाडीतील भूषण माळी व आकाश मराठे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून भूषण व आकाश दोघे स्वप्निलला खुन्नस देऊन मारहाण करण्याची धमकी देत होते. अखेर गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्वप्निल हा पावाच्या लाद्या घेण्यासाठी घरून निघाला, तेव्हाच भूषण माळी व पवन बाविस्कर यांनी त्यास रस्त्यात गाठले आणि मागे जे भांडण झाले ते निपटवून घेऊ, तू आमच्यासोबत मोटरसायकलीवर चल, असे बोलले. स्वप्निल याने नकार देताच त्या दोघांनी चॉपरचा धाक दाखविला; मात्र संधी साधत तो तेथून पळून गेला.

डोक्यात फरशी मारल्याने गंभीर जखमी

स्वप्निल ठाकूर हा पुन्हा ७.४० वाजेच्या सुमारास गणेशवाडीकडून पांचाळ गल्ली परिसरातील स्मशानभूमीजवळून जात असताना पुन्हा भूषण माळी, पवन बाविस्कर, आकाश मराठे, पीयूष ठाकूर यांनी त्यास थांबविले. आम्ही या एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नको, असे म्हणत त्यांनी स्वप्निल यास मारहाण केली, नंतर भूषण माळी याने जवळच पडलेली फरशी घेऊन ती स्वप्निलच्या डोक्यात मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या मारहाणीत त्याची सोन्याची चेनही गहाळ झाली.

पोलिसांत गुन्हा दाखल

जखमी पुतण्यास घेऊन काका विजय पवार व काही जणांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: We are the grandfathers of this area, don't follow our advice ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.