तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जग सोडून जात आहोत - पत्नीच्या नावे सोडली चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:14 PM2019-05-17T13:14:23+5:302019-05-17T13:14:53+5:30

पती, सासू, सासरे बेपत्ता प्रकरण

We are leaving the world as you want - the chips left in the wives' names | तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जग सोडून जात आहोत - पत्नीच्या नावे सोडली चिठ्ठी

तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जग सोडून जात आहोत - पत्नीच्या नावे सोडली चिठ्ठी

Next

जळगाव : आमचा तपास करू नकोस़़़आम्ही मेलो असे पत्नीला लिहिलेल्या चिठ्ठीनंतर पती, सासू आणि सासरे कुठे गेले याबाबत कुठलीच माहिती मिळत नसल्याने तर्क विर्तक लढविले जात आहे. यातच दीपकचा मोबाईल बंद येत असल्याने या चर्चेत अधिकच भर पडत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रुपालीचे सासू-सासरे हे ११ रोजी यावल तालुक्यातील चिंचोली येथे लग्नाला गेले होते. दीपक हा कंपनीत कामाला गेला असल्यामुळे घराला कुलूप होते़ नंतर १३ रोजी मावस बहिणीच्या हळदीच्या दिवशी दीपक हा पत्नीसोबत कपडे घेण्यासाठी घरी आला. त्यावेळी सासू घरी आलेल्या होत्या़ त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दीपक हा पत्नीला तूु हळदीला जा मी सायंकाळी येतो, असे सांगून कामावर निघून गेला. दीपक सायंकाळी धरणगाव येथे हळदीला जाणार होता. परंतू, पती अजूनही हळदीच्या कार्यक्रमाला आले नसल्याने रूपाली हिने फोन केला, मात्र तो बंद येत होता़
वडीलांसह रूपालीने गाठले घर
पती दीपक हा हळदीच्या ठिकाणी न आल्याने रूपाली हिने दुसऱ्या दिवशी पिंप्राळा येथे माहेरी येऊन वडीलांसह श्रीधरनगर गाठले़ मात्ऱ़़त्याठिकाणी त्यांना घराला कुलूप लागलेले दिसून आले़ पती दीपक व सासु-सासरे बाहेर गेले असतील म्हणून ती पुन्हा लग्नाठिकाणी निघून गेली़
संपर्क साधण्याचा प्रयत्ऩ़़ मात्र फोन लागेना!
धरणगाव येथील लग्नसाहेळा मंगळवारी आटोपल्यानंतर रूपाली ही रात्री ८़३० वाजता पिंप्राळा येथे माहेरी आली़ लग्नाला पती न आल्यामुळे तिने लागलीच दीपक याला फोन केला़ मात्र, फोन लागत नव्हता़ वारंवार प्रयत्न करून सुध्दा फोन बंद येत होता़ अखेर तिने संपूर्ण प्रकार हा चुलत सासरे ज्ञानेश्वर सोनगीरे यांना सांगितला आणि घरी जावून पाहणी करण्यास सांगितले़ ज्ञानेश्वर हे सुध्दा श्रीधरनगरात गेले असताना त्यांना घराला कुलूप दिसले़ ही बाब त्यांनी रूपालीला कळविली़ बुधवारी अखेर रूपाली हिने वडीलांसह घर गाठले आणि दुसºया चावीने घर उघडले़ त्यावेळी घरात कुणीही दिसून आले नाही़
डायरीसह पोलीस ठाण्यात धाव
डायरीवर लिहिलेला मजकूर पाहून घाबरलेल्या रूपालीने वडीलांसह रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली़ घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ तसेच ती डायरी सुध्दा पोलिसांकडे दिली़ रूपाली सोनगीरे हिच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती, व सासु-सासरे बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली आहे़ पुढील तपास विजय निकुंभ करीत आहेत़ दरम्यान, तिघे कोठे गेले हे अद्याप कळाले नसून घर सोडून जाण्यास मागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे़ याचा शोध पोलीस घेत आहेत़
रुपाली सोनगिरेने दिलेली डायरी पोलिसांनी केली जप्त
रूपालीने दुसºया चावीने घर उघडताच़़़तिला पलंगावर तिची डायरी दिसली़ त्यामध्ये एका पानावर तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि आई-वडील आम्ही हे जग सोडून जात आहोत, तुझी ईच्छा पूर्ण होवो़ ही सदिच्छा़़़ तुझा आणि फक्त तुझाच दीपक़ कृपया आमचा तपास करून नकोस आम्ही मेलो तुला सोडून, असा मजुकर त्यामध्ये लिहिलेला आढळून आला़ तसेच घरातील काही कपडे आणि मोबाईल,चार्जर सुध्दा दिसले नाही़ अखेर पती, आई-वडीलांसह घरातून कोठेतरी निघून गेल्याची खात्री तिला झाली़

Web Title: We are leaving the world as you want - the chips left in the wives' names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव