...म्हणून त्यांना शिवसेनेचे ५० कोटी क्षणातच दिले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:13 PM2024-03-05T13:13:02+5:302024-03-05T13:13:32+5:30
आम्ही तो निधी सहज देऊन टाकला. कारण, बाळासाहेबांचे विचार हीच आमची श्रीमंती आणि तेच आमचे ऐश्वर्य असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
जळगाव : त्यांची दानत घेण्याची आहे, देण्याची नव्हे. शिवसैनिकांनी स्वतःच्या अंगावर केसेस घेतल्या. पक्षासाठी रक्त आटवले आणि बाळासाहेबांच्या विचारांना जपलं. मात्र, ज्या शिवसैनिकांनी पक्षासाठी निधी जमविला, त्याच निधीवर डोळा ठेवला आणि मागणीचे पत्र दिले. आम्ही तो निधी सहज देऊन टाकला. कारण, बाळासाहेबांचे विचार हीच आमची श्रीमंती आणि तेच आमचे ऐश्वर्य असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
मुक्ताईनगर आणि रावेर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन मुक्ताईनगरात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सत्ता येईपर्यंत मला वापरले. ते मुख्यमंत्री झाले. मला मंत्री केले.. पण, माझ्या खात्यात प्रचंड हस्तक्षेप सुरू ठेवला. मला काट्यासारखे बाजूला फेकत गेले. मात्र, मी काय आहे, हे त्यांना दाखवायची वेळ माझ्यासह सर्वच सहकारी शिवसैनिकांवर आली. राज्यात सगळीकडे नैराश्य पसरलेलं होतं. जनता नाराज होती. विकास ठप्प होता. म्हणून उठाव केला, असा दावाही त्यांनी केला.