बहूमताचा आकडा आम्ही जुळवतो आम्हाला सभापतीपदासाठी संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:15+5:302021-09-25T04:16:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य निवृत्त झाल्यानंतर आता लवकरच स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम ...

We match the majority figure. Give us a chance for the post of Speaker | बहूमताचा आकडा आम्ही जुळवतो आम्हाला सभापतीपदासाठी संधी द्या

बहूमताचा आकडा आम्ही जुळवतो आम्हाला सभापतीपदासाठी संधी द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य निवृत्त झाल्यानंतर आता लवकरच स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी मनपा आयुक्तांना भाजपचा अधिकृत गटनेता कोण? यावर निर्णय द्यावा लागणार आहे. गटनेत्याचा नियुक्तीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी भाजप नगरसेवकांकडून स्थायी समितीत बहूमत मिळेल अशी आशा बाळगली जात आहे. बहुमताचा आकडा आम्ही जुळवितो आम्हाला सभापतीपदासाठी संधी द्या अशीच मागणी भाजपच्या काही नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे समजत आहे.

स्थायी समितीचे एकूण १६ सदस्यांपैकी ८ सदस्य नुकतेच निवृत्त झाले. यामध्ये भाजपचे ५, शिवसेनेचे २ व एमआयएमचे १ या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नवीन आठ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ही नावे देण्याचा अधिकार पक्षाच्या गटनेत्याला असतो. मात्र, भाजपचा अधिकृत गटनेता कोण? याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यात भाजपकडेच हे पद राहिल्यास भाजपला नवीन ५ सदस्य स्थायी समितीमध्ये पाठविता येतील. हे पद भाजपकडेच राहिल या खात्रीने आता भाजपने स्थायी समिती सभापतीपदासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

भाजपमधून तीन जण इच्छुक

भाजपकडे गटनेतेपद कायम राहिले तरी भाजपला स्थायी समितीमध्ये बहुमत मिळविण्यासाठी अजून २ सदस्यांना फोडावे लागणार आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी जास्त सहभाग घेण्यास नकार दिला असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, जे इच्छुक बहुमताच आकडा मिळवून आणण्यास समर्थ आहेत, अशांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपमध्ये सध्यस्थितीत ३ जण इच्छुक असल्याचीही माहिती भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

बंडखोरांमधील ५ सदस्य राहिले कायम

भाजपचे स्थायी समितीत एकूण १२ सदस्य होते. त्यात सर्वाधिक बंडखोर सदस्यांनाचा समावेश होता. आता बंडखोरांपैकी चार सदस्य निवृत्त झाल्यामुळे आता भाजप बंडखोरांमध्ये ज्योती चव्हाण, सरिता नेरकर, ललित कोल्हे, किशोर बाविस्कर व कुलभुषण पाटील हे सदस्य कायम राहिले आहे. भाजप बंडखोरांमधून किशोर बाविस्कर यांचे नाव सभापतीपदासाठी जवळ-जवळ निश्चित झाले आहे.

Web Title: We match the majority figure. Give us a chance for the post of Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.