व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे गरजेचे : लक्ष्मणराव ढोबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:34+5:302021-07-21T04:12:34+5:30
पारोळा येथे नगर पालिकेच्या सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त........................ बहुजन रयत परिषदेतर्फे नवनिर्धार संवाद अभियान अंतर्गत काढण्यात ...
पारोळा येथे नगर पालिकेच्या सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त........................ बहुजन रयत परिषदेतर्फे नवनिर्धार संवाद अभियान अंतर्गत काढण्यात आलेल्या यात्रेच्या निमित्ताने समाजबांधव व युवकांशीही संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, जळगावचे अमित पाटील, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, गटनेते बापू महाजन, नगरसेवक मनीष पाटील, संजय पाटील, नवल चौधरी, गौरव बडगुजर, पी. जी. पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे यांनी या संवाद अभियानाचा हेतू स्पष्ट केला. १८ जुलै ते ५ सप्टेंबर दरम्यान ३१ जिल्ह्यांमध्ये हे संवाद अभियान चालणार आहे तर प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंखे यांनी नगरपालिकेत महिला बचत गटांना ‘रजिस्ट्रेशन’साठी सहकार्य करा. कारण रजिस्ट्रेशनशिवाय राष्ट्रीयकृीत बँक बचत गटाचे खाते उघडत नाही. म्हणून पालिकेने बचत गटांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे सांगितले.
सूत्रसंचालन नगरसेवक पी.जी. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार कैलास पाटील यांनी मानले.
200721\20jal_4_20072021_12.jpg
पारोळा येथे पालिका सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी तरुणांशी संवाद साधताना प्रा लक्ष्मणराव ढोबळे. व्यासपीठावर उपस्थित अॅड. कोमल साळुंखे, रमेश गालफाडे, दीपक अनुष्ठान, मनिष पाटील, बापू महाजन, संजय पाटील आदी.