जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

By सुनील पाटील | Published: January 7, 2024 04:16 PM2024-01-07T16:16:56+5:302024-01-07T16:17:20+5:30

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे.

We want Jalgaon constituency Shiv Sena's claim rejected by Shinde faction Let us say it in the ears of the Chief Minister | जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे. सर्वाधिक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आम्हालाच हवा आहे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करु, ते भाजपच्या श्रेष्ठींशी बोलतील असे सांगून शिंदे गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुनील चौधरी रविवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी अजिंठा विश्रामगृहावर प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील आदी उपस्थित होते. या मतदारसंघात आढावा घेतला असता आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य आमचे आहे. अनेक संस्था आमच्याकडे आहेत. लोकसभेसाठी आमच्यासाठी पुरक वातावरण आहे. पक्षवाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

भाजप-शिंदे गटात कुरबुरी, पण वाद नाही
प्रत्येक कुटूंबात थोडं अधिक कुरबुरी असतात. तसंच भाजप व शिंदे गटात थोडं रडगाणं, दुजाभाव आहे. मात्र आमच्यात, तक्रारी वाद नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून कुरबुरी दूर करण्याचा प्रयत्न करु. इच्छा प्रकट करणे गैर नाही. आमची मागणी आहे की,जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्यावा. काही मतदार संघात भाजप दुसरी टीम तयार करीत आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात लक्ष घालतील. सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत असल्याचे चौधरी म्हणाले. 
 

Web Title: We want Jalgaon constituency Shiv Sena's claim rejected by Shinde faction Let us say it in the ears of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.