सर्वांच्या उदरभरणासाठी शिवभोजन थाळींचे उद्दीष्ट वाढवू - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:27 PM2020-03-28T12:27:54+5:302020-03-28T12:29:57+5:30

लॉक डाऊनमुळे रोजगार बुडणाऱ्यांनाही मिळेल अन्न

We will increase the purpose of Shiv Bhojas for the benefit of all - the Collector | सर्वांच्या उदरभरणासाठी शिवभोजन थाळींचे उद्दीष्ट वाढवू - जिल्हाधिकारी

सर्वांच्या उदरभरणासाठी शिवभोजन थाळींचे उद्दीष्ट वाढवू - जिल्हाधिकारी

Next

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे, अशा मंडळींना जेवण मिळण्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घ्यावी तसेच शिवभोजन थाळी केंद्र्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित विभागांना दिल्या. सध्या जिल्ह्यात ७०० थाळींचे उद्दिष्ट आहे, मात्र अशा परिस्थितीत आवश्यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल, असे संकेतही जिल्हाधिकाºयांनी दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्ह्यातील सद्यस्थिती व त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, रेल्वे पोलीस फोर्सचे कमांडट बी. पी. कुशवाह, मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव येथील स्टेशनमास्तर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. याकरीता सर्व संबंधित विभागाने याचे नियोजन करावे. तसेच यामुळे ज्या गरीब व गरजू नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यांना जेवण मिळणे आवश्यक आहे याकरीता सामाजिक संस्थाची मदत घ्यावी. तसेच शिवभोजन थाळी केंद्र्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करुन देता येतील. सध्या जिल्ह्यात ७०० थाळींचे उद्दिष्ट आहे, आवश्यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाºया वाहनांना पास देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन
काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची वाहने व रुग्णवाहिकांमधून माणसांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. याबाबत परिवहन व पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाºया वाहनांना परिवहन कार्यालयामार्फत पास देण्यात येत असून यासाठी परिवहन कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना याबाबत काही अडचण असेल अशा नागरिकांनी या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी बाहेर नेणाºया वाहनांना तसेच जीवनावश्यक वस्तू घेऊन जिल्ह्यात येणाºया वाहनांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये, अन्नधान्याच्या तसेच भाजीपाला, फळे जादा भावाने विक्री होत असल्यास याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा शाखेकडे तर औषधांबाबतची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करावी, संबंधित विभागाने आपल्याकडे आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकºयांनी दिल्या.
वापरलेल्या मास्कबाबत काळजी घ्यावी
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक मास्कचा वापर करीत आहे. परंतु वापरलेले मास्क रस्त्यावर टाकल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नये, सदरचे मास्क घंटागाडीतच द्यावे, महानगरपालिकेने त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावावी, जेणेकरुन त्यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनी घराबाहेर पडतानाच ओळखपत्र गळयात घालावे
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये याकरीता जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी घराबाहेर पडतानाच आपले ओळखपत्र गळयात अडकवूनच बाहेर पडावे, जेणेकरुन पोलिसांना तपासणी करताना अडचणी येणार नाही, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दुपारी बंद करू नका
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना लागणाºया जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी दुकाने दुपारी बारावाजेनंतर बंद करण्यास सांगण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे अशा तक्रारी येणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागास दिल्या.

Web Title: We will increase the purpose of Shiv Bhojas for the benefit of all - the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव