शेंदुर्णी येथे विद्यार्थ्यांना मिळाली शस्त्रास्त्रांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 03:03 PM2020-01-12T15:03:17+5:302020-01-12T15:03:48+5:30
विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचा इतिहास आणि पोलीस दल वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती पहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिली.
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : पोलीस वर्धापन दिनानिमित्त रायझिंग डे येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचा इतिहास आणि पोलीस दल वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती पहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिली.
कार्बाईन अश्रुधुराची नळकांडी अशी भिन्न शास्त्रे प्रत्यक्ष दाखवून त्याची मारक क्षमता व उपयोग यासंबंधी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक एस. पी. उदार व शिक्षक उपस्थित होते. पोलीस गृहरक्षक दलातील ईश्वर देशमुख, प्रशांत विरणारे, मनोज गुजर,जगदीश चौधरी, एन.एन.तडवी, जितूसिंग परदेशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले विद्यार्थ्यांना ही शस्त्रे जवळून पाहता आणि हाताळता आली. पाहिलेली ही हत्यारे पाहताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.