जागतिक शांतता दिनानिमित्त भोळे महाविद्यालयात वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:21+5:302021-09-22T04:19:21+5:30
प्रमुख वक्ते म्हणून बी. एड. कॉलेज खिरोदा येथील प्रा. डॉ. एन. एन. लांडगे आणि एनएसएस विभागीय समन्वयक प्रा. अनिल ...
प्रमुख वक्ते म्हणून बी. एड. कॉलेज खिरोदा येथील प्रा. डॉ. एन. एन. लांडगे आणि एनएसएस विभागीय समन्वयक प्रा. अनिल सावळे व प्रा. डॉ. दयाघन राणे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. पी. फालक अध्यक्षस्थानी होते.
प्रा. लांडगे यांनी महाभारत काळापासूनची विविध उदाहरणे देत जागतिक शांततेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच जागतिक शांततेसाठी विविध देश आणि जागतिक स्तराचा संस्थांनी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला आणि अहिंसा आणि जागतिक शांतता हेच विश्वात प्रगती प्रस्थापित करू शकतील, असे प्रतिपादन केले.
प्रा. अनिल सावळे यांनी अभौतिक आणि अध्यात्मिक विचार धारेमधून अहंकाराचे निर्मूलन केल्यास सामाजिक अन्याय दूर करता येतील जागतिक स्तरावरील शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर नियंत्रण करीत धोरणात्मक नीतीचा वापर करीत जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असे प्रतिपादन केले.
प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी विश्व शांतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचा आढावा घेऊन शांतता आणि कलह यामुळे केवळ सामाजिक शांतता नष्ट होत नाही तर सामाजिक विकास आणि ज्ञान आणि विज्ञानमधील प्रगती याच्या विनाशामुळे संपन्नता कशी स्पष्ट होते याचे अनेक उदाहरणे देऊन महत्त्व स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांनी जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न होऊन समानता आणि संपत्ती तसेच अधिकारांचे समान वितरण कसे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे यांनी, तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. निर्मला वानखेडे यांनी केले.
या वेबिनारला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते, असे प्रसिद्धीप्रमुख प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी कळविले आहे.