भोळे महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंटवर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:06 PM2020-08-26T16:06:47+5:302020-08-26T16:07:59+5:30

भोळे महाविद्यालयात ‘मानसिक ताण तणाव निवारण/ स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार पार पडला.

Webinar on Stress Management at Bhole College | भोळे महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंटवर वेबिनार

भोळे महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंटवर वेबिनार

googlenewsNext

भुसावळ : येथील भोळे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण, क्रीडा व मानसशास्त्र विभाग, आर्ट आॅफ लिविंग व अद्वैतानंद योगा फिटनेस व हॅपिनेस स्टुडिओ भुसावळ यांच्यातर्फे ‘मानसिक ताण तणाव निवारण/ स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार पार पडला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद व प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी आॅनलाईन आॅनलाईन उद्घाटन केले. यावेळी स्वामी प्रणवानंद वरीष्ठ मार्गदर्शक आर्ट आॅफ लिविग व वैदिक धर्म संस्थान, बंगळुरू संयोजक प्रा.डॉ.संजय चौधरी, देवेंद्र पाटील, समन्वयक व अध्यक्ष-अद्वैतानंद योगा फिटनेस व हॅपिनेस स्टुडिओ भुसावळ, आयोजन सचिव प्रा अनिल सावळे व प्रा डॉ दयाधन राणे,उपस्थित होते
वेबिनारसाठी २७९ जणांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करून सहभाग नोंदवला होता. प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रमुख पाहुणे परिचय देवेंद्र पाटील यांनी केला. आभार प्रा.अनिल सावळे यांनी मानले. तांत्रिक साहाय्य मयुरेश असोदेकर, दीपक जैस्वाल, प्रा.सीमा देवेंद्र, विनय चौधरी, आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Webinar on Stress Management at Bhole College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.