वेबसाईट हॅक करुन जळगावातील ठगाने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:26 PM2018-05-19T14:26:14+5:302018-05-19T14:26:14+5:30

औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन वस्तू खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

Website hacking and hacking the web site | वेबसाईट हॅक करुन जळगावातील ठगाने घातला गंडा

वेबसाईट हॅक करुन जळगावातील ठगाने घातला गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी केली एका विद्यार्थ्यास अटकदेशभर जाळे असल्याची शक्यतापोलीस अधिका-यांसह तज्ञही चक्रावले

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ : औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन वस्तू खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निशांत कोल्हे याने औरंगाबाद येथील एका फायनान्स कंपनीच्या वेबसाईट व आॅनलाईन सेवेत छेडछाड करुन त्यांच्या ईएमआय वॉर्ड प्रणाली या सेवेद्वारे एका कंपनीकडून ८५ हजार ५९९ रुपये किमतीची सायकल आॅनलाईन मागविली. कंपनीच्या नावावर आॅनलाईन व्यवहार होत असताना प्रत्यक्षात माल डिलिव्हरी करणाºया कंपनीला पैसेच मिळत नसल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कंपनीने केलेल्या चौकशीत निशांत याने दिग्वीजय पाटील या नावाने ही सायकल मागविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कंपनीचे जहीरोद्दीन शेख (रा.औरंगाबाद) यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार कोल्हे याच्याविरुध्द आय.टी.अ‍ॅक्टनुसार गुन्हा झाला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद येथील फायनान्स कंपनीचे अधिकारी व सायबरमधील तज्ञ जळगावात दाखल झाले आहेत. त्यांनी कोल्हे याची चौकशी केली असता दिग्वीजय हे नाव बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कोल्हे तंत्रज्ञानाची देत असलेली माहिती ऐकून फायनान्स कंपनी तसेच तंत्रज्ञानाचे तज्ज्ञही चक्रावले. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम हे सारेच गोंधळात पडले. कोल्हे हा मुख्य सूत्रधार आहे की यामागे आणखी कोणी आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. कोल्हे याच्या माध्यमातून देश व विदेश पातळीवर आॅनलाईन व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Website hacking and hacking the web site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.