पुणे ते बिलासपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:23+5:302021-06-23T04:12:23+5:30
जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर दरम्यान २ जुलैपासून साप्ताहिक गाडी सोडण्याचा ...
जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर दरम्यान २ जुलैपासून साप्ताहिक गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दर शुक्रवारी ही गाडी पुण्याहून सुटणार असून, या गाडीला जळगाव स्टेशनवर थांबा दिला असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
कोरोनानंतर प्रवाशांची वाढलेली अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे ही विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे. २ जुलै रोजी शुक्रवारी (गाडी क्रमांक ०८२३०) पुण्याहून सायंकाळी पावणेसहा वाजता ही गाडी निघणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता ही गाडी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर स्टेशनला पोहचणार आहे. या गाडीला जळगाव रेल्वेस्टेशनवरही थांबा देण्यात आला असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या गाडीला सर्व प्रकारचे आरक्षण डबे उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांना तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. बुधवारपासून या गाडीचे आरक्षण सुरू होणार असून, प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.