‘वेलकम २०२०’ : डी.जे.वरील ठेका, फटाक्याची आतशबाजीत अनोख्या ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’ वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:27 PM2020-01-01T12:27:00+5:302020-01-01T12:27:45+5:30

सरत्या वर्षाला निरोप अन् नवर्षाचे स्वागत 

'Welcome 2': Contract on DJ, welcome to the unique 'Twenty-Twenty Twenty-Year' fireworks fireworks | ‘वेलकम २०२०’ : डी.जे.वरील ठेका, फटाक्याची आतशबाजीत अनोख्या ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’ वर्षाचे स्वागत

‘वेलकम २०२०’ : डी.जे.वरील ठेका, फटाक्याची आतशबाजीत अनोख्या ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’ वर्षाचे स्वागत

Next

जळगाव : सरत्या वर्षाला ‘गुड बाय’ करत जळगावकरांनी डिजेच्या तालावर बेभान नृत्य करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. कडाक्याचा थंडीतही तरुणाईचा उत्साहाला उधाण आले होते. मंगळवारी रात्री १२ वाजताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना शुभेच्छा देत जळगावकरांनी नववर्षाचे स्वागत केले.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मंगळवारी दुपारपासून खास तयारी केलेली दिसून आली. ज्या रात्र जशी गडद होत जात होती. त्याच प्रमाणे तरुणाईचा उत्साह देखील शिगेला पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा थंडीमुळे रात्री ९ वाजेनंतर ओस पडणारे रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वर्दळ दिसून आली. काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, बहिणाबाई उद्यानासह मनपा परिसरातील खाऊ गल्लीतही विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकरांची गर्दी झाली होती. उत्साहाला गालबोट लागू नये ंंम्हणून पोलिसांचा बंदोबस्त होता.
फॅमिली पार्टीसह मित्रांचा कट्टाही बहरला
नववर्षाच्या स्वागतासाठी लहानग्यांपासून तर ज्येष्ठांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. शहरातील उपनगरांमध्ये गच्चीवर ‘फॅमीली पार्टी’ रंगल्या होत्या. तर महाविद्यालयांच्या हॉस्टेलमध्ये देखील अनेकांनी पार्टीचे आयेजन करून नववर्षाचे स्वागत केले. तर काही ठिकाणी युवकांनी नेहमीप्रमाणे शहरात पार्टी न करता शहरानजिकच्या आसोदा, आव्हाणे, ममुराबादमधील शेतांमध्ये जावून भरीत पार्टीचा बेत आखला होता. तसेच पाळधी, नशिराबाद भागातील ढाब्यांवर देखील नागरिकांनी गर्दी केली होती.
रात्रभर तरुणाई बेभान
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील एमआयडीसी भागातील हॉटेल्समध्ये खास डीजे नाईट्स चे आयोजन करण्यात आले होते. लेझर शो मध्ये तरुणाईने अक्षरश बेभान होवून नववर्षाचे जोरदार स्वागत केले. प्रशासनाकडून पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे रात्रभर जळगावकरांनी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला. रात्री १२ वाजेनंतर सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. त्यानंतर आकाशात जोरदार रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी केली.
चौकाचौकात मद्यपींवर कारवाई
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती तर मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांविरुध्द ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या. रात्री ९ वाजेपर्यंत १० जणांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. ड्रेथ अ‍ॅनालायझरव्दारे त्यांच्या शरिरातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यात आले. पहाटे चारपर्यंत बंदोबस्त होता.

Web Title: 'Welcome 2': Contract on DJ, welcome to the unique 'Twenty-Twenty Twenty-Year' fireworks fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव