सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके संदर्भात निकालाचे जळगावात ‘अंनिस’तर्फे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:54 AM2018-10-24T11:54:30+5:302018-10-24T11:54:49+5:30
उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना दिलासा
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्री आणि फटाके फोडण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
या संदर्भात जळगाव अंनिसच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र अंनिस गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवित आहे. त्यात २३ रोजी फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत फटाक्यांची आॅनलाइन विक्रीस नकार देण्यासह केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असे निर्देश दिले आहे. सोबतच दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून दिली असून रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तसेच नाताळ आणि नवीन वर्षासाठी रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. फटाके फोडण्याची वेळ मर्यादीत केल्याच्या या निर्णयाचे अंनिसतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंगला साबद्रा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा सचिव आर.वाय.चौधरी, अशोक तायडे, शहराध्यक्ष डॉ.अजय शास्त्री, अॅड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी आदींनी स्वागत ेकेले आहे.
उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना दिलासा
सर्वोच्च न्यायालयात फटाके बंदीसंदर्भात दाखल याचिकांबाबत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने फटाके उत्पादक व व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने फटाके निर्मिती करणा-या जळगाव जिल्ह्यातील उत्पादक तसेच देशभरातील १२०० कारखाने मालक, कामगार यांची बेरोजगारीची कुºहाट टळण्यासह हजारो विक्रेत्यांचा व्यवसाय बुडण्यापासून वाचला असल्याने यातून मोठा दिलासा मिळाली असल्याची माहिती जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष युसुफ मकरा यांनी दिली.