खान्देशात घोडा, बैलगाडीवरील मिरवणुकीने विद्याथ्र्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 01:43 PM2017-06-15T13:43:23+5:302017-06-15T13:43:23+5:30

शाळेत येणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी शाळेसह परीसर सजवण्यात आला

Welcome to the rally carriage of horse and bullock cart | खान्देशात घोडा, बैलगाडीवरील मिरवणुकीने विद्याथ्र्याचे स्वागत

खान्देशात घोडा, बैलगाडीवरील मिरवणुकीने विद्याथ्र्याचे स्वागत

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी शाळेची पहिली घंटा वाजली़ आणि शाळांचा परिसर गजबजून गेला. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने खान्देशात सर्वच ठिकाणी विद्याथ्र्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती़ शाळेत येणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी शाळेसह परीसर सजवण्यात आला होता व विद्याथ्र्याचे गुलाबपुष्प देऊन तसेच मिठाई देऊन स्वागत करण्यात आल़े विद्याथ्र्याना पुस्तकांचे वाटपही करण्यात आल़े  पहिल्या दिवशीच विद्याथ्र्याच्या हाती पुस्तके मिळाल्याने, विद्याथ्र्याच्या चेह:यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक ठिकाणी घोडा, बैलगाडीवरुन विद्याथ्र्याची मिरवणूक काढण्यात आली.
जळगाव शहरात विद्याथ्र्याना पेढे, शिरा देत स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी विद्याथ्र्याची घोडय़ावरून मिरवणूक काढण्यात आली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी विद्यार्थी रडत होते, हसत होते तर पालकांसह शिक्षकांचीही या प्रकाराने चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून आल़े भुसावळसह विभागातील यावल, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात जि़प़शाळांमध्येही विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आल़े मुक्ताईनगरच्या जि़प़उर्दू शाळेतर्फे विद्याथ्र्याची गावातून बैलगाडीद्वारे मिरवणूक काढण्यात आली़
अमळनेर येथील सानेगुरूजी विद्यालय, गं.स. हायस्कुलमध्ये विद्याथ्र्याच्या स्वागताबरोबरच दहावीतील गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य विद्यालयातही बॅडपथक लावून विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशीच विद्याथ्र्याना प्रतिनिधीक स्वरूपात पुस्तके देण्यात आली.
चोपडा तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवरही विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आले. विद्याथ्र्याची उपस्थिती ब:यापैकी होती.पारोळा  तालुक्यातही विद्याथ्र्याचे जल्लोषात स्वागत झाले.
खडकदेवळा येथेही विद्याथ्र्याची बैलगाडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. रंगबिरंगी फुग्यांनी बैलगाडी सजविण्यात आली होती. गणेशपूर आंधारी विद्यालयात विद्याथ्र्यांचे  गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी काढून सर्व विद्याथ्र्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.
धुळे जिल्ह्यातही शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्याथ्र्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थी उत्सुकतेने पुस्तके न्याहळत होते.
नंदुरबार जिल्ह्यात शैक्षणिक दिंडी
नंदुरबार आदिवासीबहुल जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आश्रमशाळा बिलबारा, येथे पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडीत पहिली व नवगत विद्याथ्र्यांना बसवून मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक जनजागृतीसाठी गावात रॅैली  करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Welcome to the rally carriage of horse and bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.