तुटलेली शौचालये पाहून अधिकारी अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 12:21 AM2017-02-08T00:21:11+5:302017-02-08T00:21:11+5:30
क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे पथक दाखल : तीन दिवस शहराची करणार पाहणी
भुसावळ : तुटलेली शौचालये, पाण्याचा अभाव अन् सभोवताली साचलेली घाण पाहून क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या पथकाने आश्चर्य व्यक्त केले़
केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची पाहणी केली जात आहे़ त्यात भुसावळचा समावेश आहे़ त्यानुसार क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे वरिष्ठ सहाय्यक रवी पवार यांनी शहरातील विविध भागातील शौचालयांची पाहणी केली़ त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे़ दरम्यान, तीन दिवस पथकातील अधिकाºयांचा शहरात मुक्काम राहणार असल्याचे सांगण्यात आले़
मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरिष्ठ सहाय्यक रवी पवार हे पालिकेच्या पथकासोबत शहरातील विविध भागांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले़ सुरुवातील त्यांनी मच्छी मार्केट भागातील शौचालयांची पाहणी केली पाण्याचा असलेला अभाव, तुटलेले सीट तसेच गायब झालेले दरवाजांबाबत त्यांनी तपशील नोंदवत छायाचित्रे टिपली़ त्यानंतर गौसिया नगर, आझाद कॉम्प्लेक्स, डेली मार्केट भागातील शौचालयांची पाहणी केली़ आठवडे बाजारातील भाजी मार्केटची स्वच्छता होते वा नाही याबाबत त्यांनी विचारणा केली़
पवार यांनी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणून घेतल्या़ कामावर किती वाजता येतात, काम किती वाजता संपते तसेच कामापासून घर किती अंतरावर आहे याबाबत विचारणा करण्यात आली़ प्रभारी आरोग्य अधिकारी अशोक फालक, आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे, निवृत्ती पाटील, पी़बी़पवार, व्ही़पी़राठोड आदींची उपस्थिती होती़
४क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या दिल्लीस्थित कार्यालयातून वरिष्ठ सहाय्यक रवी पवार यांना भ्रमणध्वनीद्वारे शहरातील कुठल्याही भागातील स्थळाची पाहणी करायची याबाबत सूचना मिळाल्यानंतर त्यांच्याकडून त्या भागांना भेटी देण्यात आल्या़ पहिल्या दिवशी मंगळवारी शहरातील रेल्वे स्थानकासह आठवडे बाजारातील शौचालये तसेच डेली मार्केट, मच्छीमार्केट आदी भागातील शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले़ प्रत्येक भागातील भेटींचे त्यांनी भ्रमणध्वनी छायाचित्रे टीपली़ याबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर केला जाणार आहे़
४भुसावळ पालिकेची आज परीक्षा असलीतरी तुटलेली शौचालये, पाण्याचा अभाव, शहरभर साचलेला कचरा व त्यात मोकाट चरणारी गुरे, कचराकुंड्यांचा अभाव व ओसंडून वाहत असलेला कचरा असेच काहीसे चित्र शहराच्या सर्वच भागात आहे त्यामुळे पालिकेच्या या परीक्षेत समिती किती गुण व कुठल्या निकषावर देते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ पालिकेने केवळ वैयक्तिक शौचालयासह रेकॉर्डवर भर दिला आहे़