कु:हाडला पाणीटंचाईच्या तीव्र झळा
By admin | Published: March 27, 2017 12:04 AM2017-03-27T00:04:06+5:302017-03-27T00:04:06+5:30
प्रचंड गैरसोय : जलाशयांमधील अधिक उपशामुळे उद्भवली समस्या
कु:हाड, ता. पाचोरा : कु:हाड खुर्द येथे पंधरा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्यामुळे गावक:यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे अनुक्रमे वाकडी, म्हसाळा, उमरदे जलाशय आटल्यामुळे पाण्याची ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
खूपच दिवसांनी एखाद्या वॉर्डात नळांना पाणी आल्यास गढूळ व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. यामुळे गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले व जेष्ठ नागरिकांना जुलाब व अतिसारासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील दवाखाने यामुळे नेहमीच गजबलेले दिसू लागले आहे. पाणी आणण्यासाठी महिलांनासुध्दा दूरवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याने आजार निर्माण होत आहेत. मात्र ग्रा.प.चे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
ग्रामपंचायतीस व सरपंचांना या बाबतीत विचारणा केली असता गावपरिसरातील जलाशयातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणाचे पाटबंधारे खात्याच्या कर्मचा:यांनी केले, मात्र शेतीसाठी ते उपसून टाकल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तरी संबंधितांवर वरिष्ठांनी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी गावक:यांनी केली आहे.
कु:हाडसाठी बिल्दी येथील बहुळा धरणातून गावासाठी तत्काळ पाणी योजना लवकर मंजूर करण्यात यावी (ही तर जुनीच मागणी आहे) असे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. ही योजना मंजूर झाल्यास नेहमीसाठीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाणाची सोय येत्या आठवडाभरात झाली नाहीतर ग्रामपंचायतीवर महिलांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांनी सांगितले.