नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:31 PM2018-02-27T12:31:37+5:302018-02-27T12:31:37+5:30

८० वर्षीय वृद्धाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

The well of the nashirabad farmer has been stolen for seven years | नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

नशिराबाद येथील शेतकºयाची विहीर ७ वर्षांपासून गेली चोरीस

Next
ठळक मुद्दे‘जाऊ तिथं खाऊ’चा प्रत्यय विहीर व साहित्य चोरल्याची तक्रार अन् २०११ मध्ये विहीर झाली गायब

जळगाव : मकरंद अनासपुरे अभिनित ‘जाऊ तिथं खाऊं’ हा विहीर चोरीस गेल्याच्या तक्रारीचे कथानक असलेला २००७ साली आलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची आठवण करून देणारी किंबहुना त्याचा प्रत्यय आणून देणारीच घटना जिल्ह्यात घडली आहे. नशिराबाद येथील ८० वर्षीय वृद्ध शेतकºयाची ४० वर्षीय विहीर २०११ पासून चोरीस गेली आहे. त्यामुळे या शेतकºयाला पाण्याअभावी पिक घेणेही अशक्य बनले असून न्याय मिळवून देण्याची मागणी या शेतकºयाने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दयाराम सोना रोटे (८०)असे या शेतकºयाचे नाव असून ते नशिराबाद येथे खालची अळी, होळी मैदान येथे राहतात. त्यांनी नशिराबाद येथे गट नं.१२३५ मध्ये त्यांच्या शेतात सन १९७१ मध्ये विहीर खोदली होती. तसेच विहिरीवर विद्युत पंप व पाईपलाईन बसवून त्या पाण्यावर केळी, ऊस आदी बागायती पिके घेत होते.
रोटे यांच्या शेतालगतच शेत असलेल्या दोघा शेतकरी भावंडांना अचानक ही विहीर त्यांच्या शेताच्या हद्दीत असल्याचा साक्षात्कार झाला. दोन वेळा मोजणीत विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट होऊनही २०११ मध्ये मात्र तलाठी व अधिकाºयांशी संगनमत केल्याने ही विहीर तक्रारदार शेतकºयांच्या हद्दीत असल्याचा चमत्कार घडला. इतकेच नव्हे तर या तक्रार शेतकरी भावंडांनी विद्युत मोटार व पाईपलाईनवर देखील हक्क सांगत ती काढून घेण्यास मज्जाव केला.
 मात्र तरीही रोटे यांनी २०१६ पर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर केला. मात्र या शेतकरी भावंडांनी त्यांना धमकावत पाण्याचा वापर रोखला. त्यामुळे त्यांना शेती करणे अशक्य बनले आहे.
विहीर व साहित्य चोरल्याची तक्रार
रोटे यांनी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. दोघा शेतकरी भावंडांनी तलाठी व संबंधीतांना हाताशी धरून संगनमताने विहीर त्यांच्या हद्दीत करून घेतली असून त्यावरील विद्युत पंप व पाईपलाईन आदी साहित्यही चोरले आहे. तसेच शेतात जाण्यासाठीचा वहिवाट रस्ता वापरास मनाई करीत असल्याची असल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, तलाठी व महसूल  अधिकाºयांशी संगनमतामुळे विहीर चोरीस गेल्याची तक्रार आल्याने आता जिल्हाधिकारी या वृद्ध शेतकºयाच्या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात? याबाबत उत्सुकता आहे.
अन् २०११ मध्ये विहीर झाली गायब
दोघा भावंडांच्या तक्रारीवरून २००७ मध्ये तलाठी तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पहिल्यांदा शेताची मोजणी केली. मात्र विहीर दयाराम रोटे यांच्याच शेतात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही २००८ साली पुन्हा तक्रार केल्याने तत्पर महसूल विभागाच्या तलाठी व संबंधीत अधिकाºयांनी पुन्हा मोजणी केली. मात्र त्यावेळी देखील विहीर रोटे यांच्या शेतातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र तक्रारकर्त्या दोघा भावंडांनी तलाठ्याशी व संबंधीत अधिकाºयांशी हातमिळवणी करीत २०११ मध्ये पुन्हा या शेतजमिनीची मोजणी केली. आणि आश्चर्य घडले. ४० वर्षांपासून रोटे यांच्या शेतातील विहीर तक्रारकर्त्यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: The well of the nashirabad farmer has been stolen for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.