खडसे यांच्या तक्रारीवर ते काय कारवाई करतील ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:01 PM2020-01-03T12:01:48+5:302020-01-03T12:02:04+5:30
जळगाव : भाजपच्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या नावावरच प्रचार केला, त्यांच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, बंडखोरांना मांडीवर बसविणारे खडसेंच्या ...
जळगाव : भाजपच्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या नावावरच प्रचार केला, त्यांच्या तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, बंडखोरांना मांडीवर बसविणारे खडसेंच्या तक्रारीवरून काय कारवाई करणार ? असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे़
जळगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड घोषित झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ते जळगाव पंचायत समितीत आलेले होते़ त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी आपले तिकिट कापल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी बुधवारी केला होता. त्यावर विचारणा केली असता पाटील यांनी वरील प्रतिक्रिया त्यांनी दिली़ दरम्यान, जळगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव, पारोळा या पाच ठिकाणी शिवसेनेने भगवा फडकविला असून ही सुरूवात आहे़ आगामी काळात याच पाचचे दहा केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ खडसे संपर्कात असल्यावर खर काय ते लवकरच समजेल असे सांगितले. जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत असले तरी तीन पक्ष मिळून सरकार बसवू शकतात त्या दृष्टीने जिल्हा परिषदेतही आमचे प्रयत्न राहतील़ भाजपकडे आकडे मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.