सालार नगरला महामार्ग ओलांडण्यासाठी पर्याय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:44+5:302021-01-10T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणात अनेक समस्या उभ्या राहत आहे. चौपदरीकरणानंतर गाड्यांचा वेग वाढु शकतो. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणात अनेक समस्या उभ्या राहत आहे. चौपदरीकरणानंतर गाड्यांचा वेग वाढु शकतो. त्यामुळे अपघात वाढण्याचीही शक्यता विचारात घेता सालार नगर वासियांनी भुयारी मार्गाची मागणी केली होती. मात्र ही मागणी लवकर पुर्ण होणे शक्य नसल्याने सालार नगरातून जाणाऱ्या जुन्या पुलाच्या खालूनच एक लेनचा रस्ता सुरू करून देणयाची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत नेमके काय होऊ शकते, याची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सालार नगरात पर्याय काय मिळु शकतो, याची चाचपणी केली.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रस्ताव बनल्यावर त्यात मिल्लतनगर, शिव कॉलनी आणि अग्रवाल चौक येथे भुयारी मार्ग करून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार चेंज ऑफ स्कोपच्या दहा टक्के म्हणजे ६ कोटी रकमेतून शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग करून देण्याचे निश्चीत करण्यात आले. तर अग्रवाल चौकात एक लहान बोगदा करून दिला जाणार आहे. मात्र सालार नगरच्या भुयारी मार्गासाठी जास्त निधीची गरज लागणार आहे. त्यामुळे सध्या हे शक्य नसल्याचे चित्र समोर येताच परिसरातील नागरिक फारुक शेख यांनी सध्याच्या पुलाखालून पाणी जाण्यासाठी तीन जागा आहेत. त्यातील एका लेनचा उपयोग हा रस्ता ओलांडता येऊ शकतो. त्यामुळे तेथे लहान एका लेनचा तरी रस्ता सुरू करून देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, खासदार उन्मेश पाटील आणि इतरांना निवेदन देखील दिले होते. त्यानुसार आता महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे नेमका कोणता पर्याय देता येऊ शकतो याची चाचपणी केली होती.