स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 04:38 PM2017-12-03T16:38:16+5:302017-12-03T16:38:30+5:30
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा (ता.नवापूर) येथील शिक्षक प्रमोद मधुकर चिंचोले हे द्वितीय आले. ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी’ या कार्यक्रमांतर्गत ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो?’ या विषयावरील ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये त्यांचा हा निबंध.
स्वच्छ भारत म्हणजे मी स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ, माङया भारतातील प्रत्येक गाव व नदी स्वच्छ ! स्वच्छ भारतासाठी मला जे करता येणे शक्य आहे ते मी करेल. मी माङया घरातील भाज्यांची देठे, फळांच्या साली, शेंगांची टरफले यांसारखे पदार्थ इतरत्र न टाकता छिद्रे असलेल्या मडक्यात टाकेल. साधारणत: 50 ते 60 दिवसात हे पदार्थ कुजून त्याचे खत तयार होईल. या खताचा वापर शेतीसाठी अथवा कुंडय़ातील रोपांसाठी करता येईल. रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सूचना फलक लावले जावेत यासाठी प्रय}शील राहील. व्हॉट्सअप, फेसबुक, स्काईप, ट्विटर, ईमेल यांसारख्या माध्यमांद्वारे इतरांपयर्ंत स्वच्छता संदेश पोहचवेल. परिसरातील चहाची दुकाने व हॉटेल्समालकांना चहासाठी कागदी कपांऐवजी काच किंवा तत्सम पदार्थांपासून बनविलेले कप वापरण्याचा आग्रह धरेन. जेणेकरून कागदी कपांमुळे होणा:या कच:यावर आळा बसेल. हॉटेलमालकांना मिठाई व इतर खाद्यपदार्थ उघडय़ा भांडय़ात न ठेवता झाकण असलेल्या भांडय़ात ठेवण्याबाबत विनंती करेन. परिणामी खाद्यपदार्थांमुळे होणा:या रोगराईवर अंकुश राहील. घराच्या भिंतीवर व दर्शनी भागात स्वच्छतेबाबत संदेश व घोषवाक्य असलेले फलक लावेन. छतावर पडणारे पावसाचे पाणी आजूबाजूला डबक्यात साचून रोगराई पसरते. मी हे पाणी कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था केली आहे. इतरांनाही पाणी अडविण्याचा व जिरवण्याचा आग्रह धरेल. बाजारासाठी प्लॅस्टिकची पिशवी न वापरता कापडी पिशवीचाच वापर करेन. सण, उत्सव, लग्नसमारंभ, वाढदिवस, विवाहप्रसंगी दिल्या जाणा:या भेटवस्तू कापडी पिशवीत देण्याचा आग्रह धरेल. सांडपाण्याची विल्हेवाट व त्याचा पुनर्वापर करण्याबाबत योग्य पाऊल उचलण्यासाठी ग्रामसभेत विनंती करेल. जर गावाला, शहराला, नदीला व देशाला ‘आपले घर’ मानले तर माझा भारत स्वच्छ झालाच समजा ! मी करितो संकल्प असा, स्वच्छतेसाठी शोधेन पर्याय असा, घर, अंगण, गाव, नदी, स्वच्छ होईल असा, ‘स्वच्छ भारत’ स्वप्न साकारण्या घेतो वसा.