पक्षासोबत गद्दारी करून बंडखोर आमदारांना काय मिळाले, ‘बाबाजी का ठुल्लू’; आदित्य ठाकरेंचा घणाघात
By विलास.बारी | Published: August 20, 2022 06:11 PM2022-08-20T18:11:31+5:302022-08-20T18:11:59+5:30
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुस-या टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील पाचो-यापासून प्रारंभ झाला. पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत हेाते.
जळगाव : शिवसेनेत बंडखोरी करण्यासाठी बंडखोर आमदारांना तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले. मात्र पक्षासोबत गद्दारी करून या बंडखोर आमदारांना काय मिळाले, तर ‘बाबाजी का ठुल्लू’, असा घणाघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा येथील शिवसंवाद रॅलीत केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापासून प्रारंभ झाला. पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत हेाते.
गद्दारांनी दही हंडी फोडली मात्र मलई खाण्यासाठी -
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तात्पुरते मुख्यमंत्री असा उल्लेख करीत त्यांनी काल ५० थर लावून दहीहंडी फोडल्याच्या वक्तव्य केल्याचे सांगितले. मात्र शिवसेनेसोबत गद्दारी करून या ५० आमदारांनी मलई खाल्ली आणि जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गद्दारांना काय मिळाले बाबाजी का ठुल्लू -
शिवसेनेने सर्व आमदारांना भरभरून दिले. त्यांना फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखविण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जे मंत्री होते त्याच बंडखोर आमदारांना या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली. मात्र तीदेखील दुय्यम दर्जाची. आमच्याकडे असताना प्रत्येक मंत्र्याकडे वजनदार खाती होती. त्यातच उर्वरित आमदारांना काय मिळाले तर बाबाजी का ठुल्लू, असा टोला त्यांनी हाणला.