मस्तवाल अधिकाऱ्यांना दाखवून देणार पालकमंत्री काय असतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:40 PM2020-01-10T12:40:20+5:302020-01-10T12:40:36+5:30
जळगाव : जिल्ह्यातील गाव,पाडे, वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर मस्तवाल अधिकाऱ्यांना पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ, ...
जळगाव : जिल्ह्यातील गाव,पाडे, वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर मस्तवाल अधिकाऱ्यांना पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते गुरूवारी प्रथमच जळगावात आले. अजिंठा विश्रामगृहावर गटसचिवांच्या विषयावरील बैठक आटोपून ते रावेरकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. पालकमंत्री झाल्यानंतर कोणत्या विषयांना प्राधान्य देणार? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने ज्या ग्रा.पं.ची पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल भरण्याची क्षमता नाही, त्यांना १५ एचपीचा पंप चालेल अशी सोलर सिस्टीम देणार आहे. मस्तवाल अधिकाºयांना पालकमंत्री काय असतो, ते दाखविणार आहे.