कोरोना लसीचे कॉकटेल केले तर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:40+5:302021-05-30T04:13:40+5:30
डॉक्टर म्हणता प्रतिकारक्षमतेवर परिणाम : दोन्ही डोस एकाच लसीचे असावे स्टार ७६० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना ...
डॉक्टर म्हणता प्रतिकारक्षमतेवर परिणाम : दोन्ही डोस एकाच लसीचे असावे
स्टार ७६०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणाऱ्यांना वेळेत दुसरा डोस मिळत नसल्याने पहिला डोस वेगळ्या लसीचा आणि दुसरा डोस वेगळ्या लसीचा असे केले तर असे प्रश्न समोर येत आहेत. मात्र, प्रतिकारक्षमता योग्य राहण्यासाठी दोन्ही डोस हे सारख्याच लसीचे असावे, असे स्थानिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी असे काही घडले आहे. तेथे काही विपरीत परिणाम समोर आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
जिल्हाभरात कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. अद्यापही २० हजारांवर लोकांचा हा दुसरा डोस बाकी आहे. शिवाय कोविशिल्ड लसीचे दोन डोस मधील अंतर हे ८४ दिवसांचे वाढविण्यात आले आहे. लसीच्या तुटवड्यामुळेच राज्यात १८ वर्ष वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन लस ही उपलब्ध होत नसल्याने दुसऱ्या डोससाठी उशीर झालेल्यांकडून विविध प्रश्न समोर येत आहेत.
लसींचा तुटवडा
४५ वर्षावरील १४ लाखांवर लोकसंख्या असून या पैकी सद्याच्या घडीला ३ लाखांवर लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी असलेलया संख्या ही मोठी आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर केंद्र वाढविण्यात आले आहेत. मात्र, लसीच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाला गती नाही, या वयोगटाचे आतापर्यत २२ टक्के लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण : पहिला डोस - ३८५९८७, दुसरा डोस : ११५५३३
४५ वर्षावरील लसीकरण : पहिला डोस ३१९१६४, दुसरा डोस ७५३३६
१८ वर्षावरील लसीकरण : पहिला डोस - २०७८६
कोट
योग्य प्रतिकारक्षमतेसाठी पहिला डोस ज्या लसीचा घेतला त्याच लसीचा तुम्हाला दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. पहिला डोस वेगळा आणि दुसरा डोस वेगळा असे करता येणार नाही, तशी यंत्रणाही नाही. - डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी
कोट
प्रत्येक लसीची परिणामकारकता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे पहिला डोस ज्या लसीचा घेतला त्याच लसीच दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत लसीचा तुटवडा असल्यामुळे काही ठिकाणी असे प्रयोग झाले असतील. मात्र, परिणामकारकतेमुळे शरीरात तयार होणाऱ्या ॲटीबॉडीवर याचा परिणाम होऊ शकतो. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्र विभाग
कोट
कायद्याने तुम्हाला दोन वेगवेळे डोस घेता येणार नाही, याबाबत केंद्र सरकारकडूनही काही सूचना नाहीत, मात्र, ज्या ठिकाणी वेगवेगळे डोस दिले गेले आहेत. त्या ठिकाणी काही गुंतागुंत समोर आलेली नाही. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक