काय आहे गाळ््यांचा मुद्दा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:39 PM2019-10-14T13:39:12+5:302019-10-14T13:39:51+5:30
जळगाव : जळगाव महापालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवरून जो वाद आहे, तो आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मनपाने ...
जळगाव : जळगाव महापालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवरून जो वाद आहे, तो आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मनपाने शहरात गाळे बांधून ते व्यापाऱ्यांना करार करून दिले आहेत. त्या कराराची मुदत संपली असून व्यापाऱ्यांकडे थकबाकीही आहे. त्यामुळे नवीन करारासह थकबाकी वसुलीसाठी मनपाने व्यापाºयांना नोटीस दिली आहे. पाचपट दंडाची ही नोटीस असल्याने त्यास व्यापाºयांचा विरोध आहे. यात काही गाळेधारकांनी रक्कम भरलीदेखील आहे. मात्र ज्यांच्याकडे ही रक्कम बाकी आहे, त्या विरुद्ध मनपा प्रशासनाने सोमवारी कारवाईचे अस्त्र उगारले.
या कारवाईवरून सकाळपासून वाद सुरू झाले.
सोमवारी गाळे जप्तीची कारवाई सुरू झाली असताना वाद झाला व हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. त्या वेळी तेथे व्यापारी व उपायु्क्त गुट्टे यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्नदेखील झाला.
या कारवाईच्या निषेधार्थ व्यापाºयांनी आपले दुकाने बंद करून या कारवाईचा निषेध केला.