पोलीस दलात चाललयं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 02:44 PM2019-07-12T14:44:29+5:302019-07-12T14:48:56+5:30

जिल्हा पोलीस दलाला काही तरी ग्रहण लागलय की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात १८ रोजी निंबोल येथे विजया बॅँकेत दरोड्याच्या प्रयत्नात बॅँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर खुनाच्या एकापाठोपाठ घटना घडू लागल्या.

What is the police force? | पोलीस दलात चाललयं तरी काय?

पोलीस दलात चाललयं तरी काय?

Next
ठळक मुद्दे  विश्लेषणचो-या, घरफोड्या वाढल्याखून व दरोड्याच्या घटना ठरताहेत आव्हान

सुनील पाटील
जळगाव : जिल्हा पोलीस दलाला काही तरी ग्रहण लागलय की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात १८ रोजी निंबोल येथे विजया बॅँकेत दरोड्याच्या प्रयत्नात बॅँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर खुनाच्या एकापाठोपाठ घटना घडू लागल्या. जळगाव शहरात मू.जे.महाविद्यालयाचा मुकेश सपकाळे या निष्पाप विद्याथ्यार्ची हत्या, बोदवडजवळ तृतियपंथीची हत्या, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील खून या घटनांना जिल्हा हादरलेला असतानाच बांबरुड राणीचे येथे माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरात भरदिवसा शस्त्रधारी गुंडांनी दरोडा टाकला. निंबोल व बाबंरुड या दोन्ही घटना पोलीस दलासाठी आव्हान ठरल्या आहेत.
  विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी निंबोल दरोड्याच्या तपासासाठी चार दिवस जळगावात ठाण मांडले, त्यानंतर आता पुन्हा ते जिल्ह्यात दाखल झाले.आतापर्यंत झालेल्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला, मात्र त्यात ठोस असे काही निष्पन्न झालेले नाही.
 खुन व दरोड्याच्या घटनांनी यंत्रणा हवालदील झालेली असतानाच जळगाव शहरात चो-या व घरफोड्यांच्या घटनांनी डोके वर काढले आहे. गेल्या दीड महिन्यातील असा एकही दिवस नाही की, त्या दिवशी जळगाव शहरात चोरी किंवा घरफोडी झालेली नाही. या घटनांमुळे जळगावकरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले असताना पोलीस दलाता मात्र कमालीची शांतता आहे. एकाही प्रभारी अधिका-याला किंवा गुन्हे शोध पथकाला गुन्हे घडू नये म्हणून काही उपाययोजना कराव्यात असे वाटत नाही. 
  शहरातील गुन्हे शोध पथके निष्क्रिय ठरले असून फक्त आर्थिक व्यवहाराशी संबंधितच प्रकरणात काम करताना दिसत आहे. घरफोड्या, चो-या होवोत अथवा खून याच्याशी काहीही घेणंदेणं नाही असेच चित्र शहरात निर्माण झाले आहे. झालेल्या घरफोड्या व चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी कोणीच मनापासून प्रयत्न करताना दिसत नाही, किंवा वरिष्ठ अधिकारीही हा विषय गांभीयार्ने घेत नाहीत,म्हणूनच एकही घटना आतापर्यंत उघडकीस आलेली नाही.

Web Title: What is the police force?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.