बोगद्या लगतच्या रस्त्यांचे काय?

By admin | Published: January 13, 2017 12:48 AM2017-01-13T00:48:23+5:302017-01-13T00:48:23+5:30

नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.

What is the road to the tunnels? | बोगद्या लगतच्या रस्त्यांचे काय?

बोगद्या लगतच्या रस्त्यांचे काय?

Next


जळगाव : बजरंग बोगद्याच्या शेजारीच नवसाचा गणपती मंदिरासमोर नवीन दोन बोगदे बांधण्याचे काम मार्गी लागले               आहे. मनपाने निधी दिल्याने काही महिन्यातच रेल्वेकडून हे काम                  पूर्ण  केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार असली तरीही या          नवीन होणा:या बोगद्यांना जोडणा:या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची तसेच नवीन होणा:या बोगद्यांर्पयत रस्ते करण्याची आवश्यकता आहे.
 रेल्वेने या बोगद्याच्या कामासाठी मक्तेदारास कार्यादेशही दिले असून लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे करताना मनपाने या नवीन बोगद्यांर्पयत नागरिक कसे जातील? कारण या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. त्यात प्रमुख अडचण म्हणजे एसएमआयटीकडे जाणारा रस्ता फारच अरुंद असून नवसाच्या गणपतीच्या मागील बाजुचा रस्ताही फारच अरुंद आहे. ज्या ठिकाणी बोगदे करण्यात येणार आहे, तेथे रस्त्याच्याकडेला मोठे झाडे आहेत. काम करण्यापूर्वी ती तोडावी लागतील. तसेच येथे मोठी गटार असून काही दुकानेही आहेत, ते हटवावे लागणार आहे.
नवसाच्या गणपती मंदिराच्यानजीकही मोठी गटार आहे. ती काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली असून तिची उंची वाढविण्यात आली आहे. तिही तोडावी लागणार आहे.
बाजुलाच मोठा नाला असून बोगद्यात त्याचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सध्याच्या बोगद्यात पाणी साचत असल्याने पावसाळ्यात वाहनधारकांचे प्रचंड हाल होतात.
पिंप्राळा रेल्वे गेट ते बजरंग पुलार्पयतच्या रस्त्याची दैना झाली आहे. त्याचेही डांबरीकरण करावे लागणार आहे. या अडचणी आधी महापालिकेने दूर कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली            आहे.

Web Title: What is the road to the tunnels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.