नावात काय नाही? सर्व काही आहे की !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:57 PM2017-11-12T16:57:40+5:302017-11-12T16:57:57+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचा लेख ‘नावात काय नाही?’

What's not in the name? That's everything! | नावात काय नाही? सर्व काही आहे की !

नावात काय नाही? सर्व काही आहे की !

Next

मराठवाडय़ात माणसांना मामा तर त्याच माणसाच्या बायकोला मावशी म्हणतात, हे ऐकून कोणालाही सहज ‘मामा’ बनवता येतं. हे वाचून मनात विचार आला की, नात्यात काय असतं? एका कवीचं लग्न झालं. नववधूला खूश करण्यासाठी तो म्हणाला, ‘प्रिये, तुच माझी कविता, तुच माझी प्रतिभा, तुच माझी भावना न तुच माझी प्रेरणा.’ हे ऐकून नववधूनेही लाजत लाजत उत्तर दिले, ‘तुच माझा सुरेश, तुच माझा रमेश, तुच माझा विकास न तुच माझा प्रकाश..’ तिची ही सत्यवाणी ऐकून कवीची प्रतिभा उडत गेली हा भाग वेगळा. पण मग मनात विचार आला, नावात काय नाही.? घरातील सर्व मुली-मुलांची नावं एकाच अद्याक्षरावरूनही ठेवली जातात. माङया एका मित्राचे नाव ‘स’वरून आहे म्हणून त्याच्या तीनही मुलांची नावे त्याने ‘स’वरूनच ठेवलीत. पहिल्याचे नाव ‘संग्राम,’ दुस:याचे ‘समाधान’ अन् तिस:याचे ‘संयम’. आयुष्यभर संग्राम करून त्याला समाधान मिळाले तरीही तिस:यांदा त्याने ‘संयम’ सोडला. मी त्याला गमतीने म्हणालो, ‘मित्रा, तिसरी मुलगी असती तर तिचे नाव काय ठेवले असते?’ तो शांतपणे म्हणाला, ‘समाधी’. टीव्ही मालिकांमध्ये संत, पंत आणि तंत काळातील नावे ऐकायला मिळतात. केवळ कानाला ऐकायला गोड आहे किंवा नावीन्य आहे म्हणून ही नावे आपल्याकडे ठेवण्याचीही प्रथा आहे. मागे एका मालिकेतील ‘शुभम’ हे नाव इतके फेमस झाले की, गल्ली बोळातील मुलांची नावे शुभम ठेवण्याची चढाओढ सुरू झाली. कुठल्या नावात काय असेल हे काही सांगता येत नाही. कधी तर अतिशय किडमिडीत असणा:या मुलाचे नाव ‘विकास’ असते. नेमक्या लोडशेडिंगमध्ये जन्माला येणारा ‘प्रकाश’ असतो. जिने कधी कविता वाचली नाही ती ‘कविता’ असते. प्रेम कसं करावं हे जिला समजत नाही तिचं नाव नेमकं ‘प्रीती’ असतं. पूर्वीच्या काळी मुलं जगायची नाही म्हणून त्यांची नावे दगडय़ा-धोंडय़ा, शेनपडय़ा, चिंधा, धुडका अशी ठेवली जायची आणि आश्चर्य म्हणजे या नावाची मुलं जगायचीसुद्धा. पत्रिकेत नाव छापले नाही म्हणून लग्नात विघ्न आणणारे आणि नेत्यांच्या चेल्यांनी दांगडो केल्याचे आपण पाहातोच. हे सर्व नावावरून चालतं. नवरा-बायको चित्रपट पाहून घरी परतले. पाहतात ते काय घराचे कुलूप तुटलेले. घरातले सामान अस्ताव्यस्त झालेले होते. नवरा म्हणाला, ‘कावं, हाई कोनी करं आसीन.?’ बायको हात वर करून बोलली, ‘आवं माय हाई माले काय माहीत, तो वरना नारायणले माहीत.!’ तेवढय़ात वर चढून बसलेल्या चोराने खाली उडी मारली आणि म्हणाला, ‘मन्ह नाव तुमले कसं माहीत.?’ नावावरून चोर आयताच सापडला. आपल्या घराबाहेर मोठय़ा बल्बवर ऑईलपेन्टने बापाचे नाव लिहून ‘बापका नाम रोशन’ करणा:या मुलांची काही कमी नाही. म्हणून लोक नावं ठेवतात, नाव घेतात आणि नाव बदनामही करतात. कारण नावात काय नाही.?

Web Title: What's not in the name? That's everything!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.