व्हॉटस्अ‍ॅप मेसेजने मुलांचा बदलला लृूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:38 AM2019-09-15T11:38:58+5:302019-09-15T11:44:07+5:30

चुडामण बोरसे । जळगाव : व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टीही घडू शकतात.. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या एका व्हॉटस्अ‍ॅप मॅसेजमधूृन चोपडा ...

WhatsApp Message Replaces Children | व्हॉटस्अ‍ॅप मेसेजने मुलांचा बदलला लृूक

व्हॉटस्अ‍ॅप मेसेजने मुलांचा बदलला लृूक

Next

चुडामण बोरसे ।
जळगाव : व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टीही घडू शकतात.. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या एका व्हॉटस्अ‍ॅप मॅसेजमधूृन चोपडा तालुक्यातील जवळपास १५ शाळांमधील मुला- मुलींंना रोज लागणाºया वस्तू भेट म्हणून दिल्या...आणि या मुला- मुलींचा लूकच बदलला. केस न विंचरता आणि आघोंळ न करता येणारी मुले आणि टापटीप शाळेत येऊ लागली आहेत. यामुळे शिक्षकांचाही उत्साह वाढला आहे.
हा सगळा बदल घडून आला तो एका व्हॉटस्अ‍ॅपच्या मेसेजमुळे आणि हे सर्व घडले ते चोपडा तालुक्यातील आदिवासी शाळांमधील गरजू बालकांसाठी, भावी पिढीसाठी.
काही दिवसापूर्वी चोपडा तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केल्याचा एक मेसेज व फोटो व्हॉटस्अ‍ॅप फिरत होता. पण हा फोटोच मुळात चोपडा तालुक्यातील एका शिक्षण विभागाच्या अधिकाºयाला अस्वस्थ करून गेला. कारण ज्या मुला- मुलींचा फोटो व्हायरल झाला. त्यांच्या केसांना तेल तर जाऊ द्या कंगवा पण लागलेला नव्हता, कारण होते या भागातील प्रचंड अशी गरीबी.
या अस्वस्थेतून मग मुलेही शाळेत टापटीप यावीत, याचा विचार त्यांच्या मनात सुरु झाला आणि त्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केले आणि माणुसकीला पाझर फुटावा तशी मदत गोळा होण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी आपल्यापासून सुरुवात केली. यानंतर धावून आल्या त्या केंद्रप्रमुख वंदना बाविस्कर. त्या स्वत: आजारी आहेत. महिन्याकाठी त्यांना औषधीसाठी बराच खर्च येतो. एवढे सगळे असताना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि मग मदतीचा जणू ओघच सुरु झाला.
नागलवाडी केंद्रातील जिल्हा परिषद या १५ शाळा आहेत. त्यात नागलवाडी, वराड, बोरअजंटी, वैजापूर, खाºयापाडा, गौºयापाडा, मुळ्याऊतार, शेनपाणी, कर्जाणे, मेलाणे, बोरमळी, जिरायतपाडा, देव्हारी, देवगड आणि देवझिरी या त्या शाळा. सर्व शाळा सातपुडा पर्वताच्या रांगाशी नाते जपणा-या आहेत.

४ १५ शाळेतील मुले व्यवस्थित शाळेत याव्यात आणि मुख्याध्यापक व शिक्षकांनी या मुलांच्या वैयक्तिक आरोग्याकडे नियमित लक्ष देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला बकेट, टुथपेस्ट, नेलकटर, मघ, साबण, तेलाची बाटली, कंगवा, साबण, फेस पावडरचा डबा, टॉवेल अशा रोज लागणाºया गरजेच्या वस्तू देण्यात आल्या.

४आता विद्यार्थीही टापटीपणे आणि नियमित शाळेत येऊ लागले आहेत. हे पाहून या आदिवासी केंद्रातील शिक्षकांचा उत्साह वाढला. या विद्यार्थ्यांना आम्ही ते शाळेत असेपर्यंत हे साहित्य पुरवु ,तसेच या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आम्ही जीवाचे रान करु, असा संकल्प त्यांनी सोडला. शिक्षक काय करु शकतात याचे हे उदाहरण चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील शिक्षकांनी घालून दिले आहे. या सर्व कामासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी भावना भोसले आणि विस्तार अधिकारी एस.सी गजरे यांनी मोलाची साथ दिली.

Web Title: WhatsApp Message Replaces Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.