पाचोरा बाजार समितीत मक्याची प्रचंड आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:23 PM2018-10-29T23:23:59+5:302018-10-29T23:27:27+5:30

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची प्रचंड आवक होत असून सोबतच सोयाबीन, ज्वारी, बाजरी यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.

 Wheat Massive Arrivals at Pachora Market Committee | पाचोरा बाजार समितीत मक्याची प्रचंड आवक

पाचोरा बाजार समितीत मक्याची प्रचंड आवक

googlenewsNext
ठळक मुद्देमक्याला क्विंटलला चौदाशे रुपये भाव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व्यापाºयांकडून खरेदीला जोर

पाचोरा : बाजार समितीत मका आणि सोयाबीनची प्रचंड आवक सुरू आहे. ज्वारी, बाजरी देखील चांगल्या प्रमाणात लिलावात येत असल्याने तेजीचे वातावरण आहे. या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट झाली आहे. यामुळे बाजार समितीत आलेला माल व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने शेतकºयांना लिलावात चांगला भाव मिळत आहे.
बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरीची आवक वाढली असून दररोज लिलाव होऊन शेतकºयांच्या मालाची वेळेवर विक्री होत आहे.
दरम्यान, आज अखेर बाजार समितीत चालू हंगामात मका- ५५ हजार क्विंटल, ज्वारी- १० हजार क्विंटल सोयाबीन-२० हजार क्विंटलपर्यत खरेदी झाल्याची नोंद असून मक्याला १४०० रुपये तर सोयाबीनला ३२०० रुपयांपर्यंत लिलावात भाव मिळाल्याचे सचिव बी. बी. बोरुडे यांनी सांगितले. पाचोरा बाजार समितीत सोयगाव, भडगाव, पाचोरा , सिल्लोड तालुक्यातील माल विक्रीस येत आहे.

शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा - सभापती
शेतकºयांनी शासनाच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे यांनी केले आहे.सध्या बाजार समितीत मालाची समाधानकारक आवक सुरू असून भविष्यात देखील चांगला भाव मिळेल. ज्या गरजू शेतकºयांना पैशांची आवश्यकता असल्यास त्यांनी बाजार समितीत शेतमाल तारण योजनेचा लाभ घेऊन रक्कम घेऊन जावी. शेतकºयाने आपला माल बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये आणून ७/१२ उतारा घेऊन यावा. ६ टक्के अत्यल्प व्याजदराने शासन निर्णयानुसार कर्ज उपलब्ध असून चांगला भाव मिळाल्यावर माल विक्री करून कर्जफेड केली जाते. तेव्हा शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांनी केले आहे.
 

Web Title:  Wheat Massive Arrivals at Pachora Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.