जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने गव्हाचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:53 PM2019-05-15T23:53:59+5:302019-05-15T23:54:48+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव :  जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे ...

Wheat prices rose due to demand in Jalgaon market | जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने गव्हाचे भाव वधारले

जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने गव्हाचे भाव वधारले

Next

विजयकुमार सैतवाल

जळगावजळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या आठवड्यात गव्हाची आवक कमी झाल्याने व मागणी कायम असल्याने गव्हाच्या भावात १५० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. सोबतच डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यापाठोपाठ या आठवड्यातही गव्हासह डाळीमध्येही वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी कायम असल्याने त्यांचेही भाव वाढले आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येऊन डाळींचे भाव वाढण्यासह गव्हाच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने त्यांचे भाव वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ७८०० ते ८३०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भाव ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६१०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरुन ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
गव्हातही तेजी
वर्षभरासाठी धान्य खरेदी अद्यापही कायम असून ती १५ जूनपर्यंत अशीच राहणार असल्याने गव्हाला मागणी वाढून दोन आठवड्यापासून गव्हाचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर गव्हाची आवक कमी झाल्याने भाववाढीस मदत होत आहे. २२०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२५० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू असून तिचे प्रमाण कमी झाले आहे.
तांदुळाचेही भाव वाढले
तांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही दोन आठवड्यांपासून वाढ होत आहे. यात चिनोर ३३०० ते ३७०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४३०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४९०० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती तांदुळाचे भाव ९१०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.

Web Title: Wheat prices rose due to demand in Jalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव