वाळूच्या अवैध वाहतुकीच्या डम्परच्या चाकांची हवा काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:25 PM2018-06-04T23:25:28+5:302018-06-04T23:25:28+5:30
चोपडा तालुका : रस्ता तयार करण्याच्या मध्यस्थीनंतर मिटला वाद
आॅनलाईन लोकमत
चोपडा, जि.जळगाव, दि. ४ : तालुक्यातील सनपुले येथून जवळच असलेल्या तापी नदी किनाऱ्यावरून वाळूची अवैध वाहतूक करणाºया एका कंत्राटदाराच्या दोन डंपरच्या चाकांची हवा संतप्त ग्रामस्थांनी काढली.
तायुनानी तापी नदी पात्रातच डम्परच्या चाकातील हवा काढल्याने वाहनचालकाची मोठी पंचायत झाली होती. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे सनपुले येथील रस्ता खराब होत असल्याने गावातील १५ ते २० तरुण एकत्र आले व संबंधित दोन डंपर पकडले आणि संबंधित तलाठ्यास घटनास्थळी बोलाऊन पंचनामा करून दोन्ही डंपर तहसील कार्यालयावर नेण्यात आले. संबंधित कंत्राटदार व चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे ठरले. मात्र गावाचा रस्ता करण्याच्या तडजोडीने गुन्हा दाखल करण्यात आपसात तडजोड करण्यात आलीे.
अधिक माहितीसाठी तहसीलदार दीपक गिरासे, निवासींनायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधला असता दोघांनी प्रतिसाद दिला नाही.
वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून सनपुले या गावाचा ठेका नसताना सर्रास अवैध वाहतूक सुरू होती.
तरुणांनी डंपर पकडल्यावर दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करणे गरजेचे असताना तडजोड करणे कितपत योग्य आहेश हा चिंतनाचा विषय आहे. विशेष म्हणजे तरुणांनी हा डंपर पकडल्यावर हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.