गावाबाहेर पडताच 'तो' करतो दुकानातील लोकांचे लक्ष विचलित करून चो-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:13 PM2019-05-14T23:13:16+5:302019-05-14T23:14:37+5:30
जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वामी ट्रेडर्स दुकानातील गल्लयातून तीन हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणात अक्षय ...
जळगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या स्वामी ट्रेडर्स दुकानातील गल्लयातून तीन हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणात अक्षय प्रकाश छाडेकर (वय-२१, रा़ पाळधी, ता़ जामनेर) यास अटक करण्यात आली असून त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, अक्षय हा गावाबाहेर गेला की दुकानातील लोकांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे़
कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये दीपक किसन स्वामी यांचे स्वामी ट्रेडींग दुकान आहे. या दुकानातून १० मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका तरूणाने तीन हजार रूपयांची रोकड चोरून नेली होती़ हा प्रकार मात्र, सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाला होता़ या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना वरीष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले़ नंतर फुटेजच्या आधारावर त्यांनी चोरी करणाºया अक्षय छाडेकर याला पहूर येथून अटक केली़ दरम्यान, त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सुनावणीअंती १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे रा.का.पाटील, बापु पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, विजय पाटील, अरुण राजपुत, सचिन महाजन यांच्या पथकाने केली आहे़
एमआयडीसी पोलिसांच्या दिले ताब्यात
चोरटा अक्षय छाडेकर हा जामनेर तालुक्यातील पाळधी येथे राहत असून त्याची कसून चोकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली़ अक्षय हा पाळधी येथे शेती काम करतो़ ा ज्या-ज्या वेळी पाळधी येथुन बाहेर गावी जातो त्या- त्या वेळी तो दुकानातील लोकांचे लक्ष विचलीत करुन चोरी करीत असल्याची माहिती समोर आली़ त्याच्या शहरसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे़ त्याला पुढील तपासासाठी एमआडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़