आमदार जेव्हा ट्राफीक मोकळी करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:14 PM2020-11-19T14:14:29+5:302020-11-19T14:14:29+5:30
आमदार मंगेश चव्हाण बुधवारी कामानिमित्त तहसिल कार्यालयात आले असता वीर सावरकर चौकात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण बुधवारी कामानिमित्त तहसिल कार्यालयात आले असता वीर सावरकर चौकात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. वाहतुकीचा हा खोळंबा पाहून आमदार चव्हाण हे स्वत: रस्त्यावर आले. त्यांनी वाहनांना वाट मोकळी करून दिली.
वाहनधारकांना वाहने बाजूला करण्यास सांगतांना त्यांनी हसून त्यांच्याशी संवादही साधला. यामुळे काही काळ जाम झालेली ट्राफीक सुरळीत झाली. मंगेश चव्हाण हे वाहनधारकांना विनंती करुन वाहने पुढे घेण्यास सांगत असल्याचे पाहून त्यांच्या साधेपणाचे कौतुक वाटले.
कामानिमित्त तहसिल आलो होतो. मात्र रस्त्यात वाहने उभी असल्याने वाहतूक खोळंबली होती. वाहनधारकांना वाहने बाजूला घेण्यास सांगून ती मोकळी केली. वाहतुक मोकळी करतांना आनंद वाटला.
-मंगेश चव्हाण, आमदार